♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजरंग : ताई आणि भाऊंमध्ये ” पोलिटिकल फाईट वातावरण टाईट “

MH 28 News Live , रेणुकादास मुळे :

समझने ही नहीं देती सियासत हमे सच्चाई ।
कभी चेहरा नहीं मिलता कभी दर्पण नहीं मिलता ।।

अशी सामान्य माणसाला गोंधळात टाकण्याची राजकारणी लोकांची जुनीच सवय आहे. जाहीरपणे परस्परांविरोधात तोफ डागणारे कधी एकमेकांच्या गळ्यात गळा घालतील याचा काही भरवसा नसतो. ज्याला नेता किंवा राजकीय गुरु मानले त्यालाच गुंगारा देऊन विरोधी तंबूत डेरेदाखल होण्याचे कसब केवळ राजकारण्यांमध्येच असते. खरे तर ही वैशिष्ट्यांची यादी बरीच लांबलचक आहे परंतु, तूर्तास एवढ्यांचाच उल्लेख प्रासंगिक वाटतो. ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा खाली बसत असताना चिखलीच्या राजकीय पटलावर नव्याने सुरू झालेल्या शेरेबाजीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम होत असल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदार श्वेताताई महाले आणि माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या दरम्यान रंगू पाहणारा हा कलगीतुरा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुक किती ‘ टोकदार ‘ असेल याचे स्पष्ट संकेत देणारा आहे असे म्हटल्यास चूकीचे ठरु नये.

परस्परांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या चिखली मतदारसंघातील आजी – माजी आमदारांमधील संबंध आजवर क्रिकेटमधल्या बाँलर आणि बँट्समनसारखे राहिलेत. कधी समोरून आलेल्या चेंडूवर चवताळून प्रहार करत सीमापार छटकार ठोकायचा तर कधी त्याच चेंडूचा अंदाज न आल्यामुळे सपशेल ‘ त्रिफळाचित ‘ व्हायचे अशी वेळ आलटून पालटून दोघांवरही येत असल्याचे चित्र मतदारसंघातील जनता आणि जिल्ह्यातील राजकीय जाणकारांना अनेकदा पहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर ऐन थंडीच्या मोसमात या दोघांमधील राजकारण तापत असल्याने इथली हवा गरम होत आहे.

निमित्त ग्राम पंचायत निवडणुकीचे

अन्य तालुक्यांप्रमाणे चिखली तालुक्यात देखील २८ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. खरे तर ग्राम पंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नसते. तरी सुद्धा या निवडणुकीच्या फडात उतरलेले बहुतेक पैलवान कुठल्या ना कुठल्या पक्षीय आखाड्यात दंड बैठका मारणारे व डाव – प्रतिडाव शिकलेले असल्याने सगळेच राजकीय पक्ष विजयी झालेल्या उमेदवारावर आपला दावा सांगतात ही वस्तुस्थिती आहे. मागील काही वर्षांपासून तर राज्य स्तरावरील नेत्यांमध्ये देखील आपल्या पक्षाचे एवढे सरपंच आणि सदस्य निवडून आलेल्या हे सांगण्याची अहमहमिका पहायला मिळते.

राहुलभाऊंचा दावा

याच ट्रेंडनुसार माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी २८ पैकी २२ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा दावा ४ – ५ दिवसांपूर्वी केला होता. गंमत म्हणजे राहुल गांधी यांची ‘ भारत जोडो यात्रा ‘ जिल्ह्यातून गेल्यामुळे जिल्ह्यातील ९५ टक्के ग्राम पंचायतींमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असा ‘ धमाल ‘ शोध त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने लावला. चिखली तालुक्यातील २८ ग्रामपंचायती पैकी २२ व बुलढाणा तालुक्यात असलेल्या चिखली मतदारसंघातील ५ पैकी ४ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमदेवरांनी विजयीश्री खेचून आणली असा दावा बोंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता. विशेषत: उदयनगर ( उंद्री ) येथील निवडणूक निकालानंतर त्यांची प्रतिक्रिया असलेला व्हिडीओ समाज माध्यमामध्ये चांगलाच व्हायरस झाला.

श्वेताताईंचा प्रतिदावा

राहुल बोंद्रे यांनी केलेल्या दाव्यांचा समाचार आ. श्वेताताई महाले यांनी काल घेतला. नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ” माजी आमदारांनी दिलेल्या पेड बातमीत केवळ फोटो आले तर मी घेतलेल्या सत्कार सोहळ्यात २८ पैकी २५ गावातील नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राहिले ” असे त्या म्हणाल्या. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या व्हिडिओ क्लिपची खिल्ली उडवताना ” उदयनगर निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचे पॅनल नव्हते पक्ष विरहित निवडणुका झालेल्या असतानाही माजी आमदारांनी उदयनगरच्या निवडणुकीमध्ये विजयावर जी मुजोरी, जो उन्माद व्यक्त केला त्यामध्ये काँग्रेसची संस्कृती किती मुजोर, दादागिरी व गुंडागर्दीची आहे हे दिसून येते ” अशा शब्दात आ. महाले यांनी तीव्र टीका केली.

गावगाड्यातल राजकारण किती गुंतागुंतीचं आणि बेभरवशाचं असतं हे समजून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायत निवडणूक जवळून अनुभवायला हवी. तालुक्यातील राजकारणात ‘ म्होरके ‘ असलेल्या आ. श्वेताताई महाले आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांना ग्रामीण राजकारणातले खाचखळगे अंगवळणी पडल्याने दोघांनीही गावोगावच्या कारभार्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न करणे सहाजिकच आहे. अर्थात गावातील विकासासाठी निधी लागणार असल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदार असलेल्या श्वेताताई महाले यांना अग्रस्थान देण्याचे व्यावहारिक शहाणपण नवनिर्वाचित सरपंचांपैकी बहुतेकांकडे असून माजी आमदार राहुल बोंद्रे यांना देखील नाराज न करण्याचा शिष्टाचार त्यांना अवगत आहे. त्यामुळे हे नवे सरपंच आणि सदस्य येणाऱ्या काळात देखील संबंधांचा समतोल साधतील हे वेगळे सांगायला नकोच. मात्र सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीवरुन श्वेताताई आणि राहुलभाऊंमध्ये सुरू झालेली ही पोलिटिकल फाईट तालुक्यातील राजकीय वातावरण टाईट करणारी असून दोन्ही बाजूंनी प्रतिस्पर्ध्याचा कार्यक्रम ‘ राईट ‘ करण्याचा प्रयत्न चालला असल्याचे पहायला मिळते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129