
जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मंजूर करा – चक्रधर लांडे यांचे विमा कंपनी व्यवस्थापकांना निवेदन
MH 28 News Live, चिखली : सन २०२२ – २३ हंगामील रब्बी हंगामातील बुलढाणा जिल्हयातील ३ लाख ५४ हजार शेतक-यांच्या पिक विमा त्वरित मिळावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस चक्रधर लांडे यांनी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्या मुंबई क्षेत्रीय व्यवस्थापकांकडे केली आहे. यासंदर्भात एक निवेदन लांडे यांनी दि. २३ डिसेंबर रोजी सादर केले.
चालू हंगामात सन २०२२-२३ रबी हंगामात बुलढाणा जिल्हयात ३ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु, अतिशय कमी शेतक-यांना पिक विमा मंजूर झाला. जिल्हयातून साडे चार हेक्टर शेतीवर पेरणी केली असून त्यापैकी ३ लाख ५४ हजार हेक्टर कोकणी शेतक-यांनी पिक विमा काढला तरी त्यांना ताबडतोब पिक विमा ८ दिवसाच्या आत मिळावा तसेच सदर विमा कंपनीचे जिल्हास्तरावरील अधिकारी बीएससी ऍग्री झालेले पाहिजे, त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान असलेले पाहिजे असे नसताना क्लेम करण्यास शेतकऱ्यांना अडचण होते ही बाब देखील लांडे यांनी लक्षात आणून दिली.