सहा महिन्यांपासून रखडले उदयनगर – लाखनवाडा रस्त्याचे काम. नागरिक त्रस्त
MH 28 News Live, उदयनगर: येथील चौफुली वरून लखनवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाचे काम गेल्या एक वर्षापासून कासवतीने सुरू आहे. मात्र अंदाजे ६ महिन्यापासून अर्धवट काम होऊन हा रस्ता रखडलेला असल्याने व्यापारी बांधवासह सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे.
उदयनगर लखनवाडा या मार्गाचे डांबरीकरणाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू असून गेल्या सहा महिन्यापासून रखडलेले आहे. येथील चौफुली वरून लाखनवाडा कडे जाणाऱ्या मार्ग सदर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून अर्धवट एका साईडचा काँक्रिट करून दुसऱ्या साईटमध्ये गिट्टी मुरूम टाकून काम मात्र झालेले आहे. नंतर हे काम सहा महिन्यापासून रखडलेले असून या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठान दवाखाने व बॅंका असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामावर कोणाचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराच्या मनमानी काम सुरू असून यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन उपरोक्त मार्गाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणीी व्यापारी बांधवासह ग्रामस्थांकडून होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button