
पत्रकार योगेश शर्मा यांना कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर
MH 28 News Live, चिखली : श्री कालिका देवी मंदीर संस्थान व क्रीडा संस्कृती फाऊंडेशन,नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी बुलढाणा जिल्ह्यातून स्थानिक पत्रकार योगेश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. दि. ५ जानेवारी २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमातहा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
युवा पत्रकार योगेश शर्मा हे दैनिकभास्कर या हिंदी दैनिकासह इंग्रजी दैनिक हितवादचे चिखली तालुका प्रतिनिधी आहेत. याशिवाय सुदर्शन न्यूज व न्यूज इंडिया २४×७ या वृत्तवाहिन्यांचे ते प्रतिनिधी असून वृत्त नायक या हिंदी – मराठी साप्ताहिकाचे संपादन करतात. अनेक लक्षवेधी बातम्या त्यांनी आजवर प्रसिद्ध केल्या आहेत हे विशेष. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या योगेश शर्मा यांची कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी बुलढाणा जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल चिखली तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचे हार्दिक करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button