♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते पेन टाकळी प्रकल्पातील १९ कोटी रुपयांच्या कामांचे झाले भूमिपूजन

MH 28 News Live, चिखली : गत अनेक वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या घाणमोड, मानमोड आणि पांढरदेव येथील गावांचे पुनर्वसनाच्या कामास आज सुरुवात झाल्याचा मोठा आनंद मला होत आहे .या गावातील पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या गावातील घरांच्या प्रत्येक वीट असल्याचे काम करण्याची संधी मला मिळाल्याचा मला मोठा आनंद असून या गावातील होणारे पुनर्वसनाचे काम हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श व्हावे असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी पेनटाकळी पप्रकल्पातील घाणमोड, मानमोड आणि पांढरदेव येथील पुनर्वसन कामाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी केले .

दिनांक 25 डिसेंबर रोजी पेन टाकळी प्रकल्पातील घानमोड, मानमोड आणि पांढरदेव या गावातील पुनर्वसन कामाचा भूमिपूजन सोहळा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. पेन टाकळीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन कामे मंजूर केल्याबद्दल केला प्रकल्पग्रस्त यांनी आ श्वेताताई महाले यांचा सत्कार केला.

वचनपूर्ती करीत असल्याचा आनंद – आ. महाले

पेन टाकळी प्रकल्पातील पश्चजलाने बाधितांचे पुनर्वसनाचा प्रश्न गत 12 ते 14 वर्षांपासून प्रलंबित होता . प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने पुनर्वसन व इतर कामे होत नव्हती . आ. श्वेताताई महाले यांनी सन 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. श्वेताताई महाले यांनी तारांकित प्रश्न क्र 2394 उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते . त्यावर दि 14/03/2020 रोजी सभागृहात झालेल्या चर्चेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पेनटाकळी प्रकल्पास सुप्रमा देण्यात येईल असे आश्वासन दिलेले होते प्रकल्पास सुधारित मान्यता मिळाल्याने भूसंपादन व इतर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेऊन गेल्या वर्षभरात मंत्रालयीन व अधिकारी स्तरावर बैठका घेऊन प्लॉट वाटप त्यासाठीचे नकाशे , विवीध शासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यता घेण्यासाठी पुढाकार घेतला होता . तसेच पुनर्वसनामध्ये अत्यावश्यक मूलभूत सुविधांची कामे त्यांचे प्रस्ताव त्यांची अंदाजपत्रक बनविणे त्यांना मान्यता घेऊन त्यावर निधी उपलब्ध करून देऊन तिथे मार्चपर्यंत काम सुरुवात करून देण्याचे आश्वासन आमदार शेतातील महाले यांनी दिली होती त्यानुसार मार्चच्या आत काम सुरू झाल्याचा आनंद सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

10 कोटी 22 लक्ष 90 हजार पांढरदेव साठी 863.80 लक्ष रु. किमतीच्या नागरी सुविधांच्या कामांचा भूमिपूजन

मौजे घानमोड व मानमोड (ता. चिखली जि. बुलडाणा) या गावांच्या पुनर्वसन कामांसाठी 10 कोटी 22 लक्ष 90 हजार रु. किमतीच्या तर मौजे पांढरदेव येथील विकासकामांसाठी 863.80 लक्ष रु. किमतीच्या नागरी सुविधांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा तथा पेनटाकळी प्रकल्पास 416 कोटी रुपयांच्या कामांना सुधारित मान्यता घेऊन पुनर्वसनातील मूलभूत सुविधा कामांना मान्यता मिळवून दिल्याबद्दल घानमोड व मानमोड ग्रामस्थांच्या वतीने 25 डिसेंबर रोजी आ सौ श्वेता ताई महाले भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.

या वेळी विद्याधर महाले ( ना. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव), अभिजीत नाईक अतिरिक्त जिल्हाधिकारी, भूसंपादन बुलडाणा, मा. सुनील चौधरी अधीक्षक अभियंता, प्रकल्प मंडळ, बुलडाणा, राजेश्वर हांडे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा, पाटील जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा, अमोल चोपडे कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प, मिलींद तांबगडे उपविभागीय अधिकारी, पेनटाकळी, प्रकल्प यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच अजितकुमार येळे तहसिलदार, चिखली, हिवाळे गट विकास अधिकारी, पं. स. चिखली, चतरकर पोलीस निरीक्षक, अमडापूर, संदीप कंकाळ सहा.अभि. श्रेणी २, पेनटाकळी, प्रकल्प, मेहकर, आश्रु मगर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, मेहकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास सर्वश्री डॉ. कृष्णकुमार सपकाळ, बबनराव गिर्‍हे, समाधान पाटील, दीपक म्हस्के तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, देविदास कणखर, शेषराव पाटील, सरपंच रवी डाळीमकर कव्हळा, सरपंच शारदाताई म्हळसणे करतवाडी, अंकुशराव पाटील, सरपंच चेतन म्हस्के, संदिप म्हस्के, विनोद कणखर सरपंच वरखेड, विष्णुभाऊ खंबाईतकर सरपंच महिमळ, अमोल पाटील, अनिल जाधव,भागवत खेन्ते सरपंच टाकरखेड, विष्णुभाऊ वाघ, गजानन देशमुख, राजुभाऊ चांदा, गणेश भगत, अशोक पाटील शेजोळ आदींची उपस्थिती होती. सत्कार सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, घानमोड व मानमोड यांनी केले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129