
50 पैशाचं नाणं खरंच बाद झालय का ? आरबीआयने काय केला खुलासा ते वाचा
MH 28 News Live : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2000 रुपयांची नोट बंद झालेली नाही. आतापर्यंत छापलेल्या सर्व नोटा चलनात असतील. मात्र, नव्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. आरबीआयच्या अहवालाव्यतिरिक्त सरकारने लोकसभेत 2000 रुपयांच्या नोटेबाबतही स्पष्टीकरण दिले होते. आरबीआयने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नोटांची छपाई कमी केली असून आता नवीन नोटा छापल्या जात नसल्याचे सरकारने सांगितले होते.
आरबीआयच्या मते, चलनात 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी अस्तित्वात आहेत. यापैकी एकही नाणं बंद झालेलं नाही. फक्त त्याच्या डिझाईनमध्ये बदल होत राहतो. मात्र याचा अर्थ जुनी नाणी बंद झाली असा होत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार ही नाणी वैध आहेत. म्हणजेच कोणीही ही नाणी घेण्यास नकार देऊ शकत नाही. आरबीआय रिपोर्टनुसार, मार्च 2022 पर्यंत 50 पैशांची एकूण 1 लाख 47 हजार 880 नाणी चलनात आहेत. म्हणजेच 2020 पासून या नाण्यांची संख्या वाढलेली नाहीत. 2021-22 मध्ये चलनात असलेल्या नाण्यांचे एकूण मूल्य 4.1 टक्क्यांनी वाढल. तर याच कालावधीत एकूण प्रमाण 1.3 टक्क्यांनी वाढले.
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2000 रुपयांची नोट बंद झालेली नाही. आतापर्यंत छापलेल्या सर्व नोटा चलनात असतील. मात्र, नव्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. आरबीआयच्या अहवालाव्यतिरिक्त सरकारने लोकसभेत 2000 रुपयांच्या नोटेबाबतही स्पष्टीकरण दिले होते. आरबीआयने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नोटांची छपाई कमी केली असून आता नवीन नोटा छापल्या जात नसल्याचे सरकारने सांगितले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button