
गोपाळकृष्ण गोरक्षणच्या गाई कसायांच्या दारी – प्रधानमंत्री जनकल्याणकारी परिषदेचा आरोप
MH 28 News Live, जळगाव जामोद : स्थानिक गोपाळकृष्ण गोरक्षण संस्था वादाच्या भोवर्यात सापडली असून या संस्थेवर गायींची हेळसांड व कत्तलीसाठी गायी विकल्या जात असल्याचा आरोप प्रधानमंत्री जनकल्याणकारी परिषदेकडून करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री जनकल्याणकारी परिषद महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी आज 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले की जळगाव जामोद येथे गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेच्या गाईंची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी व इतर संचालक मंडळ गोरक्षण मधील गाईंना मोकाट सोडतात तसेच जिवंत गाईला तीन खड्ड्यांच्या मधोमध उघड्यावर फेकून देऊन तिला अनेक दिवस अन्न पाण्याविना तडफडत ज्यामुळे ती अतिशय कमकुवत होऊन कावळे कुत्रे तिच्या मासाचे लचके तोडतात आणि ज्यावेळी ती अन्न पाण्याविना अशक्त होऊन मरण पावते, त्यावेळी तिला जेसीबीने केलेल्या खड्ड्यात कोणतीही औपचारिक धार्मिक विधी न करता लोटून दिल्या जाते उघड्या खड्ड्यात फेकून दिलेल्या गाईंचे मांस जोपर्यंत सळत कुजत नाही तोपर्यंत तो खड्डा उघडाच ठेवण्यात येतो याचा दुर्गंध आजूबाजूच्या परिसरात पसरतो हिंदू धर्माच्या 33 कोटी देवांचे स्थान असणारी, जिला मातेची उपमा दिलेली जाते तिचा घोर अपमान या गोरक्षणमध्ये अध्यक्ष व संचालक करत आहेत. हेच नव्हे तर गोरक्षण मधील गायी कसायांना सुद्धा विकल्या जातात, गोरक्षण मध्ये कोणी हिशोब विचारणारा नाही म्हणून हा प्रकार सर्रास अनेक वर्षापासून चालू आहे. गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेत अंदाजे 40 एकर बारामाही बागायतीची शेती असून सदर शेती ही गौरक्षण मधल्या जनावरांना हिरवा चारा मिळावा यासाठी दान दिलेली आहे. परंतु संस्थेचे अध्यक्ष स्वतःच्या स्वार्थापोटी सदर जमीन भाड्याने देत असून त्याचा येणारा भाडा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत असल्यास आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आला गौरक्षण मधल्या गाईंना पुरेसा चारा भेटत नसल्यामुळे गाईंची हालत गंभीर होत चाललेली आहे व त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्यांच्या चाऱ्यासाठी शेती व गौरक्षण मध्ये असलेले व्यापारी संकुल च्या माध्यमातून येणारा भाडा गाईंच्या चाऱ्यासाठी पुरेसा आहे परंतु गाईंना पुरेसा चारा का भेटत नाही हा शोधण्याचा भाग आहे हेच नव्हे तर गोरक्षण मध्ये मागील अनेक वर्षापासून दरवर्षी 500 च्या जवळपास गाई असतात त्या गाईंचे जन्मलेले नवजात वासरू व गोरे कुठे आहेत याचासुद्धा शोध लावण्याची गरज आहे. गोपाळ कृष्ण गोरक्षणचे अध्यक्ष व संचालक मंडळावर गोवंश हत्याबंदी कायदा आणि गोरक्षण संहिता अधिनियमानुसार कायदेशीर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची माग या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळेस प्रधानमंत्री जनकल्याणकारी परिषद सचिव देवेंद्र सिंग सोमवंशी, राज्य महासचिव जे व्ही मोरखडे, जिल्हा सचिव संदीप देवगीरकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम गायकी, चंचल तायडे आरती डवले, देवलाल वनडे, संतोष तिरेराव यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.