
बाईक चोरटे विहिरीत लपवायचे चोरलेल्या मोटारसायकली. पण अखेर पोलिसांनी छडा लावलाच. एका आरोपीस अटक, विहीरीतून बाईक काढण्याचे काम सुरू
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्ह्यातील सरकारी कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणाहून मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्यासाठी कामाला लागली होती. त्यात पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम वय ( ३८ ) याला ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चक्क एका विहिरीत दुचाकी टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी शेगाव परिसरातील एका विहिरीतून दुचाकी बाहेर काढायला सुरुवात केली आहे.
चोरटे दुचाकी टाकायचे विहिरीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरणारी टोळीच बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय होती. दरम्यान पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम वय ( ३८ ) याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली होती. यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
अखेर पोलिसांनी हिसका दाखवला अन् सैय्यद वसिम बोलू लागला सैय्यद वसिम याने परिसरातील काही दुचाक्यांची मोडतोड केल्याचीही माहिती पोलिसांना दिली. त्याच्यासोबत आणखी काही जण या टोळीत असून पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहीरीत टाकत होते. चौकशीत ही माहिती उघड झाली आहे. चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहीरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेले असून आणखी एका विहिरीत सुद्धा अश्या दुचाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जवळपास 20 ते 30 दुचाकी असण्याची शक्यता दुचाकी चोरांनी या विहिरीत 20 ते 30 दुचाकी टाकण्यात आल्याची माहिती चोरट्याने पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी सदर विहिरीतून दुचाकी काढण्यास सुरुवात केली आहे. या विहिरीतून 20 ते 30 दुचाकी टाकण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आणखी एका विहिरीत दुचाकी टाकण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून पोलिसांना प्राप्त झाली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button