♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक घटना… पत्नीचा खून करून वृद्धाची गळफास आत्महत्या. जळगाव जामोद तालुक्यातील घटना

MH 28 News Live, जळगाव जामोद ( अमोल भगत ) : जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या माऊली भोटा येथील साठ वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या वृद्धाने झोपेत असलेल्या पत्नीचा मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालत खून करून स्वतःही घराच्या छताच्या लोखंडी अँगल ला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

सविस्तर असे की जळगाव जामोद तालुक्यातील माऊली भोटा येथील रहिवासी असलेले बुधाजी वानखडे हे मानसिक रोगी असल्यामुळे गावाजवळ असलेल्या शेतामध्ये वृद्ध व त्याची पत्नी असे दोघेजण झोपडी मध्ये राहत होते.चार दिवसापासून बुधाजी वानखडे हे स्वतःच बडबड करत होते. तसेच विनाकारण पत्नी शोभाबाई यांच्यासोबत भांडण करत होते. दि. 27 डिसेंबरच्या रात्री शोभाबाई वानखडे यांचा वृद्धपती बुधाजी वानखडे यांनी रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या शोभाबाईंचा कुराडीने मानेवर घाव घालून खून केला. त्यानंतर स्वतःही झोपडीत असलेल्या कापसाच्या गंजीवर चढून झोपडीच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.. सकाळी बुधाजी वानखडे यांचा मुलगा सदानंद वानखडे हा गव्हाला पाणी देण्याकरिता आला असता त्यांनी आई व बाबाला जोर जोरात हाक मारण्यास सुरुवात केली असता झोपडीतुन काही आवाजाला नाही जोरात त्याने दरवाजा उघडला असता त्यांना शोभाबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या दिसल्या व समोरच वडीलही गळफास घेऊन लटकलेले दिसले असता त्याने आरडाओरडा केली आवाजाने गावातील लोक धावून आले. मुलगा सदानंद वानखडे यांनी घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी पाठविले. या गुन्ह्यामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कलम 302 चा गुन्हा दाखल झाला असून सदर दोन्हीही मृत्यू बद्दल घातपात आहे की आणखी काही याबद्दल पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129