♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कर्जाचा डोंगर असह्य… वृद्ध शेतकरी दाम्पत्याने मृत्यूला कवटाळले

MH 28 News Live, नांदुरा : नापिकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. वसंत डामरे (७०) आणि सरला डामरे (६५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथील डामरे कुटुंबाकडे दोन एकर जमीन आहे. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे डामरे कुटुंबाला दिवसेंदिवस अवघड होत चालले होते. त्यात कर्जाची परतफेड कशी करणार, याची चिंताही त्यांना सतावत होती. याच चिंतेतून डामरे दाम्पत्याने जहाल विष प्राशन केले. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शेतीची जोखीम कमी करू, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न साधने निर्माण करू, शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज देऊ, शेतकऱ्यांना मिळकतीची साधने उपलब्ध करू, अशा घोषणा सरकारकडून सतत केल्या जात असल्या तरी वास्तव यापेक्षा अगदी उलट असल्याचे चित्र आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129