तुमच्या आधार कार्डला 10 वर्ष झालीत का ? तर मग लगेच अपडेट करून घ्या !
MH 28 News Live : हा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डधारकांनी त्यांचे आधारकार्ड अद्ययावत केले नसल्यास आधारकार्ड बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले आधारकार्ड दहा वर्षांपूर्वी काढले असतील व त्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल केले नसतील, अशा नागरिकांनी आपल्या ओळखपत्राचा पुरावा व पत्त्याचा पुराव्यासह संबंधित मुळ कागदपत्रे घेऊन आधार केंद्रावर जाऊन ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
ओळखपत्राचा नमुना व पत्त्याचा पुरावा संबंधित कागदपत्राची माहिती ही uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक आधार केंद्रावर कागदपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी. वय वर्षे 18 असलेल्या नागरिकांचे नवीन आधारकार्ड काढावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या आधार केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या नागरिकांचे आधारकार्ड बनलेले आहेत ते आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, ठसे व नाव पूर्वीप्रमाणे अद्ययावत करु शकतात. नवीन बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सर्व आधार केंद्रावर पूर्वीप्रमाणे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button