♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजरंग – भाजपासाठी 2023 ठरणार महत्त्वाचे, कशी असेल पक्षाची कामगिरी ?

MH 28 News Live : मागील 8 वर्षांपासून देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला भारतीय जनता पक्ष सध्या राजकीय पटलावर शिर्षस्थानी आहे. केंद्रासह 12 राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री असून 4 राज्यांमध्ये हा पक्ष सत्तेत सहभागी आहे. उर्वरित 14 पैकी 8 राज्यांच्या विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, असे असले तरी पक्षासाठी 2023 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे असून आव्हानात्मक देखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष या वर्षात कशी वाटचाल करणार आणि पुढील वर्षी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या यशाची दुसऱ्यांदा कशी पुनरावृत्ती करणार हे पाहण्यासारखे असेल.

कालपासून सुरू झालेलं 2023 हे वर्ष भाजपसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार आहेत.यंदा भाजप गांधी कुटुंब आणि काँग्रेसला धक्का देणार 2023 मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि जम्मू-काश्मीरसह एकूण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारा भाजप या दोन्ही राज्यांत काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचा पराभव करून भाजपला गांधी कुटुंब आणि काँग्रेस दोघांनाही धक्का द्यायचा आहे. कारण, हे दोन्ही नेते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करण्यास भाजप सज्जयाच वर्षी कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी त्यांची थेट लढत होणार आहे. मध्य प्रदेशातील आपल्या बालेकिल्ल्यातील सत्ता कायम राखण्याचं आणि दक्षिण भारतातील एकमेव राज्य असलेल्या कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे. या दोन्ही राज्यांसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केलीये.

भाजपसाठी जम्मूची निवडणूक महत्त्वाची ठरणार. जम्मू – काश्मीरमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. जम्मूमध्ये भाजप आधीच मजबूत स्थितीत आहे. परंतु, यावेळी पक्ष काश्मीर खोऱ्यातही मजबूत उपस्थिती नोंदवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. या वर्षी त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराममध्येही विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. त्रिपुरामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे.

जेपी नड्डांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढणार?दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. भाजप हायकमांड 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. या बैठकांची कमान प्रामुख्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांच्याकडं असणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129