
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत आनंद मेळावा संपन्न
MH 28 News Live, चिखली : दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे म्हणून शनिवारी दि. 31 रोजी आनंद मेळावा मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या आनंद मेळाव्याचे उद्घाटन मीनाक्षी गवते यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून हायकोर्टाचे वकील अँड. अविनाश गुप्ता व कांचनताई पाटील यांची उपस्थिती लाभली.
द चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या स्नेहसंमेलनाचा 31 डिसेंबर हा तिसरा दिवस होता. तोही अति उत्साहात व आनंदाच्या भरात पार पडला. विद्यार्थ्यांनी या दिवशी वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली, त्यामध्ये झाडे वाचवा झाडे जगवा, स्वच्छ भारत व व्यायामाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणात संचालक मंडळाचे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे देखील भरभरून अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे भरभरून कौतुक केले. 2020 पासून जी शिक्षण प्रणाली सुरू झाली आहे त्याविषयी पालकांनी पालक जागृत होणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांमध्ये कला गुण व कौशल्य असल्याशिवाय चांगला विद्यार्थी घडूनच घडू शकत नाही याशिवाय खऱ्या अर्थाने माणूस तयार होणे होणे आवश्यक आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे व एक नवा विचार घेऊन ही शाळा कार्यरत आहे असे डॉ. गुप्ता म्हणाले.
त्यानंतर शाळेच्या “प्रतिबिंब” स्मरणीकेचे प्रकाशन दि चिखली अर्बन विद्यानिकेतनचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणीकेमध्ये लेख, कविता, शब्दकोडे, विनोद आणि चित्रकला अश्या प्रकारचे विध्यार्थ्यांचे कला कौशल्य नमूद केले आहे. त्यानंतर आनंद मेळावा मध्ये पालकांचे देखील विविध सादरीकरण झाले व पालकांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रर्शन करण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रमानपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले.