
बालिका दिनी दे. माळीच्या कु. श्रद्धा व भक्ती या भगिनी ने खाऊ च्या पैशातून दिली विद्यालयास मोठी भेट
MH 28 News Live, मेहकर : महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक संजय जाधव यांच्या जुळ्या मुली कु. श्रद्धा व भक्ती जाधव यांनी आपल्या विद्यालयाची गरज लक्षात घेता .गेली कित्येक वर्ष जापून ठेवलेल्या खाऊच्या पैशातून कचरापेटी भेट दील्या शाळेतील सर्व वर्गातल्यांमध्ये केली तब्बल दहा हजार रुपये किंमतीच्या पारस कंपनीच्या या कचरा पेट्या बालकदिनी त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आदर्श वसा जोपासत विद्यालयात सप्रेम भेट दिल्या.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सविताताई गाभणे तर प्रमुख अतिथी म्हणून संचालिका सौ.प्रमिलाताई गाभणे तर प्रमुख वक्त्या सौ किरण गाभणे, प्राचार्य विश्वनाथ बाहेकर पर्यवेक्षक म.वी. गाभणे हे उपस्थित होते. यांना प्राचार्य भाई कर यांनी सर्व मुलींनी यांचा आदर्श असा घेतला कृतीशील जीवन जगावे असे विचार व्यक्त केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ यांचा सुंदर पेहराव करून त्या मुलींनी हा आदर्श उपक्रम राबवला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रुणल कलोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. प्रांजली काळे यांनी केले तर आभार प्रा. अनिता पाटील यांनी मानले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button