
अवकाळी पाऊस बरसला, जिल्ह्यातील पीकांची मोठी हानी
MH 28 News Live बुलढाणा : मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होतंच. आता ह्या अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, कांदा अशी पिकं धोक्यात आली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, नांदुरा, शेगाव इथं पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तर भंडारा, गोंदियात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे.



