
जिजाऊ जयंतीला जन्मलेल्या मुलींच्या नावे आ. श्वेताताई महाले उघडणार सुकन्या समृद्धी खाते
MH 28 News Live, चिखली : मुलींचे भवितव्य सुरक्षित व्हावे , बालिका ही जन्मा पासूनच आर्थिक सक्षम व्हावी यासाठी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंतीदिनी चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या कन्येचा १२ जानेवारी या दिवशी होईल त्या बालिकांच्या नावाने पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजने खाते आ. श्वेताताई महाले या स्वतःच्या पैशातून उघडुन देऊन माँ जिजाऊंना अनोख्या पद्धतीने मानवंदना व सदर बालिकेला आयुष्यभराची आठवण सोबत देणार आहेत. खाते सुरु ठेवण्यासाठी दर वर्षी भरावयाची रक्कम पालकांनी भरावयाची आहे.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?
मुलींचे भवितव्य सुरक्षित व्हावे यासाठी सर्वात लोकप्रिय व फायदेशीर योजना म्हणजे पोष्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ होय. नारीशक्तीला समृद्ध करण्यासाठी
बालिका सशक्तिकरण मोहिमेंतर्गत तळागाळातील गरीब गरजू व सर्वच स्तरातील मुलींना स्वतःचे आयुष्य जगण्याची व स्वप्न साध्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होय. सदर सुकन्या समृद्धी योजनेत दहा वर्षाखालील मुलींची खाते उघडता येते. केवळ २५० रुपयांमध्ये खाते काढता येते. दरवर्षी रुपये १०० पासून रुपये एक लाख ५० हजार इतकी रक्कम गुंतवणूक करता येते. या खात्याला दरवर्षी ( ७.६ % ) वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. एका मुलीच्या नावाने एक खाते उघडता येते. खाते उघडल्यावर दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतात. खाते सुरू केल्यापासून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा खातेधारकाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यासही खाते बंद करता येते. खातेधारकाचे वय १८ वर्षे पुर्नझाल्यावर लग्नासाठी, उच्च शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्यांना ही रक्कम काढता येणार आहे.
१२ जानेवारीला जन्मलेल्या मुलींबाबत माहिती द्यावी
चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची भविष्य उज्वल व्हावे समृद्ध व्हावे यासाठी आ. श्वेताताई महाले यांचे कडून सतत प्रयत्न सुरू आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी त्या लवकरच रोजगार मेळावा घेणार आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये जिकडे तिकडे विकास कामांची सुरू आहेत. शेतकरी, महिला समृद्ध व्हाव्या यासाठी तर प्रयत्न करीत आहेतच एवढेच नव्हे तर मा जिजाऊंच्या जन्मदिनी जन्मलेल्या बालिकेच्या नावाने पोस्टात खाते उघडून त्या बालिकेचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची मोहीम सुद्धा आ. श्वेताताई महाले यांच्या या उपक्रमाने सुरू होत असल्याने जन्मापासूनच बालिकेचे भविष्याची चिंता सोडवण्याचा छोटासा का होईना प्रयत्न त्यांच्या वतीने सुरू झाला आहे. यासाठी उद्या १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जन्मदिनी चिखली विधानसभा मतदारसंघात ज्या कन्येचा जन्म झालेला असेल त्या कन्येच्या पालकांनी त्या कन्येच्या जन्माची माहिती आ. श्वेताताई महाले यांचे जनसंपर्क कार्यालय सेवालय या ठिकाणी देण्यात यावी किंवा 9422940340 , 9021799111 या भ्रमण ध्वनिवर माहिती देण्यात यावी जेणेकरून जन्मलेल्या कन्येच्या नावाने पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे सोयीचे होईल असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने करण्यात येत आहे.