
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपने काढली चिखलीत पदयात्रा
MH 28 News Live, चिखली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी देशातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे. हे आपण जाणताच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली नगर तर्फे आयोजित १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा काढण्यात आली. या मध्ये राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकारण्यात आली.
ही पदयात्रा स्वातंत्र्यवीर चौक, जुने गाव, चिंच परिसर, बैल जोडी चौक, राजा टावर, जस्तम चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समारोप करण्यात आले. पदयात्रेच्या पूर्वी प्रास्ताविक नगर अध्यक्ष डॉ. पंकज शेटे यांनी या तर आभार नगर सहमंत्री आदित्य उन्हाळे यांनी मानले. प्रमुख उपस्थिती प्रशांत देशमुख, चिखली नगर संघटन मंत्री अभिषेक भेंडे, चिखली नगर कार्यकारणी महाविद्यालयीन कार्यकारिणी विद्यार्थी व विद्यार्थिनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले उपस्थित होते .