
सुलतानपूर ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नाही
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत सुलतानपूर येथे कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी देण्याची मागणी वंचित नेते तथा सुलतानपूर ग्रामपंचायत सदस्य भाई संघपाल पनाड व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी लोणार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद प्रमाणे सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे व मुंबई नागपूर महामार्ग तसेच शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बसलेले हे तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. या ठिकाणी अनेक कॉलेज महाविद्यालय असून या गावांमध्ये शासनाच्या वतीने अनेक विकास कामे वरिष्ठ स्तरावून येतात. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याकरिता गावच्या व गावकन्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी देण्यात यावा
अन्यथा आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करण्यात येईल. व होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपल्यावर राहील असेही निवेदनात नमूद आहे सदर निवेदनावर वंचित नेते तथा सुलतानपूर ग्रामपंचायत सदस्य भाई संघपाल पनाड संतोष शिंदे शिवशंकर निलंग शुभम पनाड सरस्वती निर्मळे समीना बी जाकीर खान जैबुनबी शेख अहमद राजिका परवीन अ. जियाउल्ला आदी सदस्यांच्या स्वाक्षरी आहे.