
ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करा; निवृत्ती चिभडे यांची मागणी
MH 28 News Live, लोणार : ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी टिटवी येथील निवृत्ती किसन चिभडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद प्रमाणे निवृत्ती चिभडे यांचा मुलगा संतोष चिभडे यांना पाच जणांनी दि. २७ जुलै २०२२ ला सुऱ्याने बेदम मारहान केली होती. त्या पाच लोकांपैकी टप्या टप्याने तीन लोकांना अटक केली परंतु कृष्णा राठोड यांना अटक केली नाही. तसेच धोंडु हाकम राठोड यांनी हायकोर्टामधून तात्पुरती (अटक पुर्व जमानत घेतली) होती त्यामुळे तो आपल्या कुटूंबियांना धमक्या देत राजरोज गावात फिरत असल्याचे म्हटले आहे. मात्र परंतु नागपूर उच्च न्यायालयाने धोंडू राठोड याची अटक पुर्व जमानत दि. ५ जानेवारी रोजी रद्द केली आहे. तेंव्हा यांना तात्काळ अटक करावे जेणे करुन आरोपी फरार होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा मला लोकशाही मार्गाने अमरण उपोषण व इतर मार्ग अवलंबावे लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनासोबत नागपूर उच्च न्यायालयाचे निकालाची प्रत सुद्धा निवृत्ती चिभडे यांनी जोडली आहे.