
माळी समाजाबद्दल अश्लील पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करा – विविध संघटनाची मागणी
MH 28 News Live, लोणार : शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथे काही समाजकंटकांनी मोबाईल व्हाट्सअप तथा इंस्टाग्राम या माध्यमांवर माळी समाजाबद्दल अश्लील अपमान जनक पोस्ट्ट टाकल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई मागणी लोणार तालुक्यातील माळी समाज बांधवासह विविध संघटनांनी तहसीलचे तहसीलदार सैपन नदाफ यांचे मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी समता परिषद कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कैलास इरतकर, समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन रामदास कापुरे, सावता सेनेचे संतोष गाडेकर , दत्ता राऊत, नगरसेवक गजानन जाधव, माजी नगरसेवक श्याम राऊत, गजानन खरात, अभिमन्यू मोरे, शिवदत्त राऊत, रंजीत जावळे, विजय घोडके, विकास डेंगले, सत्यवान खोटे, बाळा जावळे, अजय चिपडे, मयूर जाधव, अरुण जावळे, बंडू जावळे, वसंता जावळे, राजू इरतकर, गजानन मोरे, संजय जाधव, विजय शिंदे, शिवाजी चोपडे, राहुल खरात, विजय खरात व समस्त ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.