♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अपघात – रोही आडवा आल्यामुळे टिप्पर उलटलून दोन ठार, पाच जखमी

MH 28 News Live, मोताळा : रस्ता पार करताना अचानकपणे मधेमधे आलेल्या रोहिला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले. मोताळा – वडगाव रस्त्यावर काल रात्री घडलेल्या या अपघातात पाच जण देखील जखमी झाले आहेत. जीव घेतला.

याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, १९ जानेवारीच्या रात्री अकरा वाजे दरम्यान रेती वाहणारे टिप्पर (चेचिस क्र. MB 1 GWGCD8NRPE4344) मजुरांना घेऊन निघाले होते. दरम्यान मोताळा वडगाव रोडवर चांदखेड नाल्याच्या समोर रोही टिप्परच्या समोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालक किरण अरुण इंगळे अंदाजे वय ३२ वर्ष राहणार सारोळा मारुती, याने टिप्पर वळवण्याचा प्रयत्न केला. पण भरधावस्थेला हा ट्रक अनियंत्रित होऊन जागेवरच उलटला. पुढच्याच क्षणी टिप्परमध्ये बसलेले नितीन समाधान इंगळे ( वय २८ ) आणि विरेंद्र राजेंद्र पाटील ( वय २७ ) रा. वडगाव ता. मोताळा हे दोघे फेकल्या गेले. दोघेही घटनास्थळावरच गतप्राण झाले. तर संजय देवसिंग हिवाळे, किशोर शांताराम हिवाळे, प्रमोद विठ्ठल हिवाळे, शांताराम प्रभाकर हिवाळे आणि ट्रक चालक किरण इंगळे असे पाचही जण जबर जखमी झाले आहेत. शरद पाटील यांच्या परिवारामध्ये शोक कळा पसरली आहे. सदर अपघात प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक किरण इंगळे यांच्या विरोधात आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129