
पाश्चात्य भाषेचा अतिरेकी वापर ही मराठीची गळचेपी, मराठी भाषेचे संवर्धन होणे काळाची गरज – रेणूकादास मुळे एस. पी. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संवाद विद्यार्थांशी
MH 28 News Live, चिखली : “जगात भाषेच्या एकून वापरण्यात मराठी भाषेचा १० वा क्रमांक आहे.तीचा वापर सातत्याने होणे आवश्यक आहे . पाश्चात्य भाषेचा अतिरीक्त वापर करणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी होय.मराठी भाषेचे संवर्धन होय हीच काळाची गरज होय असे प्रतिपादन विद्यार्थ्यानशी संवाद साधतांना पत्रकार व लेखक रेणुकादास मुळे यांनी केले.
स्थानिक एस. पी. एम. कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभाग द्वारा आयोजीत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशातून उच्च शिक्षण विभाग व मराठी भाषा संचालनालय यांच्या आदेशान्वये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमीत्त लेखक भेट या उपक्रमात संवाद विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याकरीता सुप्रसिद्ध साहित्यीक लेखक व पत्रकार रेणुकादास मुळे वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुभाष गव्हाणे व प्रा. प्रफुल्ल गवई हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय संयोजक डॉ.प्रफुल्ल गवई केले तर आभार डॉ. बाळकृष्ण इंगळे यांनी मानले.