बिबट्याचा हैदोस… जिवघेण्या हल्ल्यातून डासाळ्यातला युवक बालंबाल बचावला; किन्ही सवडद शिवारात दोन गुरे केली फस्त; उदयनगर परिसरात घबराट…
MH 28 News Live, उदयनगर ( झिया काझी ) : येथुन नजीकच असलेल्या डासाळा येथे शेतात जाण्यासाठी केलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. परंतु, सुदैवाने हा युवक जिवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावला.
डासाळा येथील इयत्ता दहावी मध्ये शिकणारा ओम भगवान गायकवाड हा तरुण शाळेतून येऊन शेळृया चारण्यासाठी शेतात गेला असता २७ जानेवारी सुमारे बारा वाजताच्या दरम्यान शेळ्या हाकण्यासाठी समोर गेला. तेवढ्यात बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला परंतु, त्या हल्ल्यातून सोबत असलेल्या लोकांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला लगेच उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्याला खामगाव येथे रेफर करण्यात आले होते मात्र तेथुन सुद्धा अकोला येथे हलविण्यात आले आहे. या हल्ल्यात त्याचे थोडक्यात प्राण बचावले आहे. हा बिबट्या जवळपास दोन ते अडीच वर्षापासून शिवारात मुक्तपणे संचार करीत असल्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे वेळोवेळी वन विभागाला सूचना दिल्या असुन वन विभागाने यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष देला नाही असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे.
किन्ही सवडद शिवारात दोन गुरे केली फस्त
दरम्यान किन्ही सवडत गावाच्या कुसुंबा शिवारात गोठ्यात बांधलेल्या दोन जनावरांना बिबट्याने ठार केल्याची घटना २६ जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली आहे. कुसुंबा शिवारात सहदेव भास्कर धुरंधर यांचा गट क्रमांक ३६ मध्ये शेत असून सदर शेतातील गोठ्यात जनावरे बांधलेली असतांना बिबट्याने दोन वासरावर हल्ला करून ठार केले त्यामध्ये सदर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने केली आहे या अगोदर ही बिबट्याने हल्ले करुन शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे त्यामुळे वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे. वनपाल पी. एन.जाधव, वनरक्षक जी. एस. उबरहंडे, पशुवैद्यकीय अधिकारी संदेश राठोड,
वनकामगार ए. पी. राठोड एस. एस. अंभोरे, पी. एन. चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकरी सहदेव धुरंदर समक्ष पंचनामा करून पुढील शवविच्छदनासाठी अमडापुर पाठवला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button