
पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाच शेवटचा हप्ता त्वरीत द्या – संजय वाकोडे यांची मागणी
MH 28 News Live, चिखली : नगर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा शेवटचा हप्ता त्वरीत देण्यात यावा अशी मागणी संजय वाकोडे यांची मागणी रिपब्लीकन पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे यांनी तहसीलदार डॉ. अजीतकुमार येळे यांच्याकडे केली.
या संदर्भात दि. ३१ जानेवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले. संजय वाकोडे यांनी आपल्या सहकार्यंसह २६ जानेवारी रोजी म्हाडाच्या मुंबई येथील मुख्यालयात अधिकार्यांची भेट घेऊन उचित हप्ता देण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली. तेंव्हाच संबंधित अधिकार्यांशी मुख्याधिकारी चिखली यांच्याशी चर्चा घडवून आणली. तेंव्हा पालिकेतील वित्त विभागातील अधिकार्यांकडून थकीत अनुदान त्वरीत वितरीत करण्याचे मुख्याधिकारी यांनी मान्य केले. तीन वर्षापासून अनुदान न मिळाल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत; तरी सदर योजनेतील लाभार्थ्यांना शेवटचा करना त्वरीत वितरीत करण्याचे आदेश मुख्याधिकारी चिखली यांना देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात शशीकांत जाधव मिलिंद घेवंदे, विनोद खंडाळकर, प्रकाश जोगदंड, उध्दव आराख आदींचा समावेश होता.