
संत गाडगेबाबा पुतळ्याबद्दल धोबी समाजाने दिले नगर पालिकेला निवेदन
MH 28 News Live, चिखली : वार्ड नं.११ मध्ये नझुल शिट ३६ व सि.स.नं. १०६० चौरस फुट आकाराची महाराष्ट्र शासनाची जागा आहे. सदर जागेमध्ये व्यायाम शाळा होती, परंतु ही व्यायाम शाळा ही गेल्या ५ – ६ वर्षापासून बंद असल्यामुळे ही महाराष्ट्र शासनाची जागा संत गाडगेबाबा स्मृती स्थळासाठी मिळावी अशी मागणी धोबी समाजातर्फे करण्यात आली.
यासंदर्भात नगर पालिका प्रशासनाला मुख्याधिकारी यांच्या नावे दि. ३१ जानेवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतांना संजय सोनुने, महैश सोनुने जयंत सोनुने, शैलेश सोनुने, राजू गाडेकर, प्रकाश वाघ, अनिल हिवाळे, सुनील क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, दिलीप ऊद्रकर आदी समाजबांधव उपस्थित होते.