
औंढा येथील १. १४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी खामगावातील तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. एका माजी नगरसेवकाचाही समावेश
MH 28 News Live, खामगाव : काल मध्यरात्रीदरम्यान हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरात काही ठिकाणी धाड टाकून १ कोटी १४ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या, याच संदर्भात खामगाव येथील तिघांना आज रोजी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलिस स्टेशन हद्दीत एका इसमाला बनावटी नोटा देवुन त्याची फसवणुक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून आंदा पोस्टेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासात शहरातील तिन जणांची नावे समोर आल्याने आज मध्यरात्री दरम्यान तिन ठिकाणी धाडी टाकुन तिघांना ताब्यात घेण्यात आले असुन एका जणाकडे बनावट नोटा आढळल्या आहेत व या तिघांपैकी एक जण माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे.