♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली अर्बनची विद्यार्जन कुंभ मुदतठेव योजना घडविणार मुलांचे उज्ज्वल भविष्य ! दहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावे मासिक ठेव योजना

MH 28 News Live, चिखली : विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या चिखली अर्बन बँकेने गत महिन्यातच सुकन्या ठेव योजना ग्राहकांच्या आग्रहामुळे परत एकदा सुरू केली होती. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला; परंतु यामध्ये केवळ मुलींच्या पालकांनाच गुंतवणूक करता येत होती. त्यामुळे काही ग्राहकांनी बँकेकडे मुलांसाठी योजना काढावी, अशी मागणी केली. त्यानुसार बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी विद्यार्जन कुंभ मुदतठेव योजना तसेच विद्यार्जन मासिक ठेव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून मुला, मुलींचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे.

० ते १० वयोगटातील मुलांच्या पाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे. सर्वसामान्य पालकांना आपल्या मुला, मुलींच्या शिक्षण तथा लग्नासाठी बचत करण्याची इच्छा असतानादेखील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोठी गुंतवणूक करता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन चिखली अर्बन बँकेने सुकन्या ठेव योजना सुरू केली आहे. पूर्वी मुलींसाठीच असलेली योजना पालकांच्या आग्रहाखातर मुलांसाठीदेखील राबविली जात आहे. विद्यार्जन मुदत ठेव योजनेमध्ये मुला, मुलींच्या जन्मापासून १० वर्षापर्यंत भावी शिक्षणासाठी गुंतवणूक करता येणार आहे. तसेच विद्यार्जन मासिक ठेव योजनेत ० ते १० वर्षे वयोगटातील पाल्यांच्या भवितव्यासाठी ही मासिक ठेव योजना आकर्षक व्याजदर असल्यामुळे हजारात गुंतवणूक करून ती लाखात परत मिळणार आहे.

एकरकमी गुंतवणूक न करु शकणाऱ्या पालकांनी मासिक ठेवचा लाभ घ्यावा : गुप्त
अनेक पालक एकरकमी गंतवणूक करू शकत नाहीत. असे पालक विद्यार्जन मासिक ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी महिन्याला आपल्या उत्पन्नातून ही गुंतवणूक करू शकतात. यामध्ये मिळणाऱ्या आकर्षक व्याजदरामुळे हजारात केलेली गुंतवणूक लाखोंत मिळणार आहे. एकरकमी गुंतवणूक न करू शकणाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच एक रक्कमी गुंतवणूक करणाऱ्यांनी विद्यार्जन कुंभ मुदतठेव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे.

ऑडिट ‘अ’ वर्ग प्राप्त बॅंक
ऑडिट ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त बॅंक असलेल्या चिखली अर्बनमध्ये आजची बचत ही बालगोपालांचे उज्ज्वल भविष्य घडविणारी ठरणार आहे. यातूनच सामर्थ्यशाली भारत घडविणार आहे. चिखली अर्बन बॅंकेतील प्रत्येकी ५ लाखांच्या ठेवींना डीआयसीसीचे संरक्षण कवच दिले जाणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129