
चिखली अर्बन बँकेतर्फे महिला बचत गटांना ३३ लाख ५६ हजाराचे कर्ज
MH 28 News Live, डोणगाव : सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणारी दि.चिखली अर्बन को-ऑप बँक शाखा डोणगाव च्या वतीने ४ महिला बचत गटांना ३३ लाख ५६ हजाराचे कर्ज वितरण करण्यात आले.
महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या दृष्टिकोनातून बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी महिला बचत गटकर्ज योजना बँकेच्या माध्यमातून राबवली आहे. या माध्यमातून हजारो महिलांना स्वयम रोजगाराच्या संधी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने आज डोणगाव शाखेच्या वतीने महिला बचत गटांना सतीश गुप्त यांच्या हस्ते कर्ज वितरित करण्यात करण्यात आले.
आज मध्यमवर्गीय कुटंब एक रक्कमी गुंतवून करू शकत नाही .सुकन्या योजने ला भरभरून प्रतिसाद मिळाला याच माध्यमातून अनेक पालकांनी मुलांसाठी पण योजना आणण्याची मागणी केली होती त्याचाच विचार करून
दि. चिखली अर्बन बँकेने लहान मुलांनसाठी विद्यार्जन मासिक, विद्यार्जन कुंभ या दोन योजना सुरू केलेल्या आहेत
या योजनेत गुंतवणूक करून आजची बचत बालगोपाळांचे सामर्थ्यशाली भविष्य घडवण्यासाठी सर्व बचतगटाच्या भगिनींनि या योजनेत सहभागी होण्याचे आव्हान बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त यांनी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, पालक शाखेचे सल्लागार राजकुमार सारडा, जयंत बिडवई, शाखाधिकारी सुरज खंडेलवाल, बँकेचे कर्मचारी व महिला बचत गट प्रतिनिधी माहुरे उपस्थित होते.