पोलिसांच्या वेशात येऊन रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतलं; पत्नी आणि आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न
MH 28 News Live, बुलढाणा: कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. आज आंदोलन सुरू होताच तुपकर अचानक प्रकटले. पोलिसांच्या वेशात आलेल्या तुपकर यांनी आंदोलनात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा.
height=”912″ class=”aligncenter size-full wp-image-5733″ />
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होताच रविकांत तुपकर या आंदोलनात सहभागी झाले. ते पोलिसाच्या वेशात होते. यावेळी तुपकर यांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवत अंगावर पेट्रोल घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी अंगावर पेट्रोल घेतलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी लगेचच तुपकर यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, तुपकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बुलढाण्यातील वातावरण तापलं आहे. शेतकरी वर्गात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेत जिल्हा कृषी अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते तुपकर यांच्याशी चर्चा करत आहेत.
तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनला चांगला भाव द्या, पीक विम्याची रक्कम द्या, अतिवृष्टीची रक्कम द्या आदी मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या मागण्या मान्य नाही झाल्या तर १० फेब्रुवारी रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा तुपकर यांनी दिला होता.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button