♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोताळ्याजवळ अपघात; आँटो रिक्षा उलटून ५ जखमी

MH 28 News Live, मोताळा : तालुक्यातील रोहिणखेड गावाजवळील पोल्ट्रीफार्मजवळ रोहिणखेड येथील ऑटो प्रवाशी घेवून जात असतांना आज दुपारी ५ वाजेच्या दरम्यान ऑटो पलटी झाले. यामधील जखमी ५ जणांना १०८ वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार हा मोताळाचा आठवडी बाजार असल्याने रोहिणखेड येथील ऑटो चालक प्रमोद (बाळ) देशमुख हे आपल्या ऑटो क्र.एम.एच. 28 एच. 5855 मध्ये आज १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास ऑटोमध्ये प्रवाशी घेवून मोताळ्याकडे जात होते.

यावेळी ऑटोमध्ये पाटीवर पंम्प घेवून जाणाऱ्या एका इसमाने हालचाल केल्याने ऑटो रोडच्या खाली उतरला, ऑटो रोडवर घेत असतांना ऑटो पलटी झाला. यामध्ये ऑटोमधील प्रवासी शमशाद मेहबूब शहा ( ६० ), रमेश इंगळे ( ३२ ), सोनुबाई इंगळे (२० ), गोपाळ पोकळे ( ३० ) व रोशनी रमेश इंगळे ( ११ ) सर्व रा. रोहिणखेड हे जखमींना १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129