
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय, बुलढाणा भरती जाहीर, सहायक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षक व सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करा !
MH 28 News Live / बुलढाणा : भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय, बुलढाणा येथे एकूण ५ रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
📌 रिक्त पदांचा तपशील
सहायक प्राध्यापक – ३ जागा
शारीरिक प्रशिक्षक – १ जागा
सहाय्यक ग्रंथपाल – १ जागा
🎓 शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक – संबंधित विषयातील Master’s Degree
शारीरिक प्रशिक्षक – M.P.Ed. किंवा समकक्ष पदवी
सहाय्यक ग्रंथपाल – B.Lib. किंवा M.Lib.
💰 वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक – रु.१०००/- प्रति थियरी क्लास व रु.२०००/- प्रति प्रॅक्टिकल क्लास
शारीरिक प्रशिक्षक – रु.१२०००/- प्रतिमहिना
सहाय्यक ग्रंथपाल – रु.१००००/- प्रतिमहिना
📨 अर्ज प्रक्रिया
अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अंतिम तारीख – २६ सप्टेंबर २०२५
अपूर्ण अथवा उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
📮 अर्जाचा पत्ता
द असोसिएट डीन,
भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय,
C/o Agril. टेक्निकल स्कूल, धाड रोड, बुलडाणा,
जि. बुलडाणा – ४४३००१
🔗 महत्त्वाच्या लिंक
📄 PDF जाहिरात डाउनलोड करा – https://shorturl.at/36taG
📝 अर्जाचा नमुना डाउनलोड करा – https://shorturl.at/8ZR3H
🌐 अधिकृत वेबसाईट पाहा – https://www.pdkv.ac.in/
👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करून ही संधी साधावी. अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात जरूर पाहावी.



