
मध्य प्रदेशातील रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी, खामगाव तालुक्यातील ३ महिला बेपत्ता
MH 28 News Live : मध्यप्रदेश येथील सिहोर मध्ये मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली आहे. सिहोर इथे मोफत रुद्राक्ष वाटप चा कार्यक्रम सुरू आहे त्याठिकाणी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.
त्यामुळे सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. लाखो भाविक सिहोरला दाखल झाले आहेत त्याठिकाणी लाखोंच्या संख्येत भाविक दाखल झाल्याने काही प्रमाणात चेंगराचेंगरी देखील झाली आहे. सिहोरला बुलडाणा जिल्ह्यातून ही अनेक भाविक गेले आहेत.
त्यामधील ३ महिला भाविक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत तीन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात दिली. सिहोरला गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याने ही तक्रार दाखल केल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. या महिला वाडी, सुटाळा खुर्द इथल्या रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button