
नाफेडतर्फे तुरीला ६६०० रूपये प्रति क्विंटल दर; विक्रीसाठी तूर आणा, पणन महामंडळाचे आवाहन
MH 28 News Live,.बुलडाणा : जिल्ह्यात नाफेडतर्फे तूर खरेदी सुरवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ६ हजार ६०० रूपये प्रति क्विंटल हमीदराने तूर खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी बाबत नोंदणी दि. २१ जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.
तूर खरेदीसाठी नोंदणी दि. ६ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. तसेच खरेदीचा कालावधी दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली असून दि. ३० एप्रिल २०२३ राहणार आहे. जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये ६ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु., केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, केंद्र – उंद्री, कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा, केंद्र – मलकापूर पांग्रा, बीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बिबल केंद्र – किनगाव जट्टू या केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी सहा ठिकाणी तूर खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रवरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.