
जलबचत आणि जलसंवर्धन काळाची गरज – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली: भविष्यात जर युद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल अशी भिती अनेक पर्यावरण तज्ञ व्यक्त करीत असतात. याला कारण ही तसेच आहे . दरवर्षी बऱ्या पैकी पाऊस पडून ही केवळ पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व नियोजन नसल्याने दरवर्षी मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होत असते. पाणी टंचाई निर्माण होत असल्याने आमच्या आया बहिणीना अनेक किलोमिटर वरून पाणी आणावे लागते. जमिनीतील पाण्याच्या साठ्याचे मोठया प्रमाणावर उपसा होत असल्याने विहिरीत पाणी राहत नाही . शेकडो फुटांवरून हजार फुटा पर्यंत आता बोअर घेऊन जमिनीतील पाण्याचा मोठया प्रमाणात उपसा केल्या जात आहे. त्यामूळेच पाण्याची टंचाई मोठया प्रमाणावर होत असल्यानेच ” जल है तो कल है” चा संदेश द्यावा लागत आहे. त्यामुळेच जलबचती सोबतच प्रत्येकाने जलसंवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी चिखली शहरालगत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यात साठवण केलेल्या जलाचे पूजन करतांना केले.
आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने चिखली विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी जल संवर्धन व्हावे आणि जमिनीतील पाण्याचा साठा वाढावा यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यापैकी चिखली शहरालगत श्री अंधाऱ्या महादेव मंदिरामागे जुने गाव, जांबुवती नदीववर तीन ठिकाणी बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील जलाचे 20 फेब्रुवारी रोजी पुजन आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
७०० एकर आणि तीन गावांना होणार लाभ
आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने चिखली शहराला लगत जांबूवंती नदीवर बांधण्यात आलेल्या सलग तीन सिमेंट बंधाऱ्याचा फायदा जुने चिखली , तांबूळवाडी , बारीवाडी आणि चांधई या परिसरातील सुमारे ७०० एकर क्षेत्रातील जमिनीला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होत आहे . या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी तुडुंब भरलेल्या असल्याने शेकडो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे निर्माण झालेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश गुप्त अध्यक्ष चिखली अर्बन बँक, चिखली तर विशेष उपस्थिती म्हणून रामकृष्णदादा शेटे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली. अंकुशराव पाटील ज्येष्ठ नेते, ॲड. मंगेश व्यवहारे ज्येष्ठ नेते, भाजपा सुरेंद्रप्रसाद पांडे ज्येष्ठ नेते, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष , भाजपा डॉ. कृष्णकुमार सपकाळ, चिखली तालुकाध्यक्ष, भाजपा, . प्रा. वीरेंद्र वानखेडे, जिल्हा कार्य. सदस्य, भाजपा, सागर पुरोहित शहराध्यक्ष, युवा मोर्चा भाजपा, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, नारायण बापू देशमुख ज्येष्ठ नागरिक, चिखली, चेतन देशमुख, महाजन, रामदासभाऊ देव्हडे ज्येष्ठ नेते, भाजपा, आनंदराव हिवाळे ज्येष्ठ नेते, भाजपा, सुनील देशमुख, बुलढाणा तालुका अध्यक्ष, भाजपा, डिगांवर चवरे ज्येष्ठ नागरिक, चिखली, नंदकिशोर कळसकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला . सूत्रसंचालन रोहन देशमुख यांनी केले.