♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी राहुलभाउंनी मुखाग्नी देत दिला अखेरचा निरोप. मानसेवा हिच ईष्वरसेवा समजुन आपले आयुष्य खर्ची घालणारे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे अनंतात विलीन

MH 28 News Live, चिखली : उजाड माळरानावर आपल्या भगिरथ प्रयत्नातुन शिक्षणाची गंगोत्री आणन्याबरोबरच सहकार क्षेत्राला चालना देणारे प्रख्यात रामायण निरूपनकार कर्मयोगी सिध्दविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पहाटे दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभाबाई, दोन मुले जितेंद्र व राहुल बोंद्रे तथा कन्या सौ. सुजाताताई, स्नुषा सौ. भारतीताई व अँड. सौ. वृषालीताई बोंद्रे, नातवंडे असा बराच मोठा आप्त परीवार आहे. अनुराधा नगरीत मावळत्या सुर्याबरोबरच विशाल जनसमुदायाच्या उपस्थिीत साश्रुनयनांनी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व त्यांच्या कुटूंबियांनी मुखाग्नी देत दिला अखेरचा निरोप. यावेळी जिल्हयातील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणीक, औद्योगिक, या व इतर क्षेत्रातील गणमान्य मान्यवरांची मोठया संख्येने उपस्थिीती होती.

मानवसेवा हीच ईष्वर सेवा समजुन आपले आयुष्य मानवतेच्या कल्याणास्तव अव्हयातपणे वाहुन घेणारे कर्मयोगी स्व.तात्यासाहेब यांचा जन्म १२ सप्टेंबर १९४२ रोजी झाला होता. मागिल काही महिन्यांपासुन वृध्दापकाळातील आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान आज पहाटे त्यांचे देहावसान झाले, अंतीम दर्शनाकरीता कर्मयोगी स्व. तात्यासाहेब यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या निवासस्थानी व तदनंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या अनुराधा नगरीतील वानप्रस्थाश्रम पर्णकुटी येथे ठेवण्यात आले होते.

एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यानिष्ठ कार्यप्रणालीचे पुस्कृतकर्ते म्हणुन सर्वदुर परिचित असलेले कर्मयोगी स्व. तात्यासाहेब तत्वबोध रामायण यासह असंख्य धार्मीक ग्रंथांचे सखोल अभ्यासक व निरूपण करणारे स्व. तात्यासाहेब यांनी आपल्या जिवनातील अंतीम पडावात वानपस्थाश्रमात जीवन जगले. स्व.तात्यासाहेब अध्यात्मीक साधनेसह साहित्यीक, आचार्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, राहुल सांकृत्यायन, आदी अनेक थोर भारतीय लेखकाचे व संतांचे साहीत्याचे ते अभ्यासक होते.

अनुराधा परीवाराचे जनक स्व. तात्यासाहेब यांनी समता अर्बन को.आँप क्रेडिट सोसायाटीच्या रूपाने विदर्भातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करीत श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणी, अनुराधा अर्बन को.आँप बॅंक या व इतर माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीला उभारी दिली. याच बरोबर चिखली परिसराच्या शैक्षणीक विकासात तात्यासाहेबांनी उल्लेखनीय योगदान देत तक्षशिला महाविद्यालय, अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन, नर्सीग काॅलेज, आदी शिक्षणाची दालने उभारून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक प्रगतीच्या वाटा मोकळया करून दिल्या.
स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी सन १९७१ साली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेतून प्रथमच नगराध्यक्ष म्हणून आपल्या कारर्कीदीचा ठसा अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच दर्जेदार शिक्षण आणि सुदृढ आरोग्य, याबरोबर माणसांच्या मुलभूत गरजा पुर्ततेच्या माध्यमातून जनतेच्या मनावर उमटविला आहे.

दरम्यान १९९० साली अनुराधा मिशनची स्थापना करीत समाजातील गोरगगरीब आणी गरजु वर्गाला निशुल्क वैद्यकीय सुविधा व शस्त्रक्रीया उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मानवसेवा हीच रूग्णसेवा या ब्रिद वाक्यानुसार गत ३२ वर्षापासून अनेक आरोग्य शिबीरांचे आयोजन केले. या माध्यमातुन लाखो रूग्णांनी याचा लाभही घेतला हे येथे उल्लेखनीय आहे.
कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण जिल्हयासह राज्यात वा-यासारखी पसरली. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या चिखली येथील राजाटाॅवर परीसरातील निवासस्थानी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरासह सर्वपक्षीय राजकीय, सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रमुख पदाधिका-यांनी कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पार्थिवाचे अंतीम दर्शन घेण्याकरीता गर्दी केली होती.

आज सायंकाळी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या अंत्यविधी प्रसंगी मावळत्या सुर्याबरोबरच विशाल जनसमुदायाच्या उपस्थिीत साश्रूनयनांनी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व त्यांच्या कुटूंबियांनी मुखाग्नी देत दिला. याप्रसंगी काँग्रेसचे नेते खासदार मुकूल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अँड.यशोमतीताई ठाकूर, बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी आमदार बबनराव चैधरी, माजी जिल्हाधिकारी भा. ई. नगराळे यांचे संवेदना व्यक्त करणारे शोकसंदेश प्राप्त झाले; तर खासदार प्रतापराव जाधव, आमदार डाॅ.संजय रायमुलकर, माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, राणा दिलीपकुमार सानंदा, श्यामभाऊ उमाळकर, शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, डाॅ. विकास बाहेकर, पत्रकार सुधीर चेके पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे यांनी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जीवन चरित्रावर आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री भाररतभाऊ बोंद्रे, मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, माजी आमदार विजयराज शिंदे, विजयराव खडसे, योगेंद्र गोडे, रामकृष्णदादा शेटे, सतीश गुप्त, आशिष रहाटे, विजय कोठारी, भाऊसाहेब लाहोटी, मा. आ. तोताराम कायंदे, स्वातीताई वाकेकर, मनीषाताई पवार, अँड. नाजेर काझी, कासम गवळी, जालिंदर बुधवत, अँड. शर्वरी तुपकर, शैलेश सावजी, नंदुभाऊ बोरे, स्वामी हरीचैतन्य महाराज, कैलास साखरे वैजापूर, डाॅ. मिलींद शाहीर सोलापूर, हाजी रशिदखाॅ जमादार, तहसिलदार डॉ. अजितकुमार येळे, ठाणेदार विलास पाटील, संतोष खांडेभराड, धनंजय देषमुख, तेजेंद्रसिह चौहाण, पत्रकार गजानन धांडे, अनिल म्हस्के, सिध्दार्थ आराख, यांच्यासह बुलडाणा जिल्हा काँग्रेस, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महिला काँग्रेस, जिल्हा, तालुका व शहर पदाधिका-यांसह जिल्हातील चिखली मतदार संघातील पत्रकार बांधव, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया तसेच परीसरातील नागरीक व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी प्रा.उन्मेष जोषी व गणेश धुदंळे यांनी सूत्रसंचलन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129