नॅशनल अबॅकस स्पर्धेत जी चॅम्प सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
MH 28 News Live, लोणार : नॅशनल लेवल अँबँकस कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये लोणार येथील जी चँम्प सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दि. १२ फेब्रुवारी रोजी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रितेश अवचार, गोपाल तनपुरे, आर्थव डोळे, विराट मापारी, समर्थ भालेराव, सार्थक धांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ज्युनिअर लेवलमध्ये काव्या भालेराव, शेख तनवीर, प्रांजल दुधमोगरे, आराध्या मादनकर, स्वरा साळवे, प्रणव शिंदे व पार्थ शेजुळ हे सुद्धा विजयी ठरून द्वितीय क्रमांक मिळवले तसेच या स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जी चॅम्पच्या शिक्षिका सविता गजानन निखाडे यांना सुद्धा बेस्ट टीचर व बेस्ट सेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button