
जिल्ह्यातून पहिली महिला कंपनी सेक्रेटरी झालेल्या रजनी महाले हीचा बालाजी अर्बनतर्फे झाला सत्कार
MH 28 News Live, चिखली : स्थानिक बाळासाहेब देवरस प्राथ. विद्यामंदिर चिखली येथे संस्थेचे सचिव सुदर्शन भालेराव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात प्रथम महिला C.S. (कंपनी सेक्रेटरी) होण्याचा मान मिळवलेल्या कु. रजनी गजानन महाले हिच्या सत्काराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते.
संस्थेच्या वतीने कु. रजनी गजानन महाले हिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सुदर्शनजी भालेराव यांचा सुद्धा वाढदिवसानिमित्त सतीश गुप्त यांच्याकडून सत्कार करण्यात आला. बालाजी अर्बन परिवाराकडून नेहमीच चिखली शहर व परिसरात विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी आयोजित करण्यात येत असतो. जेणेकरून त्याची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांना मिळेल हा त्यामागील प्रांजळ उद्देश असतो. आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बालाजी अर्बनचे सरव्यवस्थापक अनिल गाडे चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीशजी गुप्ता व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.मंगेशभाऊ व्यवहारे यांनी आपल्या मनोगतून कु. रजनीचा गुणगौरव करून तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे तोंड भरून कौतुक केले यावेळी कु. रजनी हिने सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेऊन सुद्धा आपण आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले व त्याचे सर्व श्रेय आपले वडील श्री. गजानन महाले यांना दिले. तसेच बालाजी अर्बन परिवाराकडून जो तीचा मानसन्मान केला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेशभाऊ व्यवहारे व सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ संचालक नारायणराव खरात, प्रतापराव खरात, धनुभाऊ व्यवहारे, चिखली अर्बन चे तज्ञ संचालक राजेश व्यवहारे,चिखली अर्बनच्या संचालिका सुनीता भालेराव तसेच संस्थेचे विश्वस्त शार्दुल व्यवहारे, सुदीप भालेराव ,अलकाताई व्यवहारे , अलकाताई खरात, गजानन महाले बालाजी अर्बनचे सरव्यवस्थापक अनिल गाडे, रमेश देशमुख, अशोक नाईक तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पी. पी. देशमुख यांनी केले.