
पेपरफुट प्रकरण अपडेट – पेपर फोडण्यासाठी मास्तरांचा खास ‘खुपिया’ Whatsapp गृप; असा आहे पेपर फुटीचा घटनाक्रम…
MH 28 News Live, सिंदखेड राजा : बारावी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघेही बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील खासगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती मिळत आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहोचली आहे. तसेच, अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत. आता या पेपरफुटीचा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला आहे.
लोणार येथील एका खासगी शाळेवरील शिक्षक शे. अकील शे. मुनाफ यांनी ३ मार्ज रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा मोबाईलवर फोटो काढून तो किनगावजट्टू येथील गजानन शेषराव आडे यांच्यासह अनेकांना पाठविला. त्यांनतर गजानन आडे यांनी शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक तथा शिक्षक गोपाल दामोदर शिंगणे यांना पाठविला. गोपाल शिंगणे याने ” खुपीया ‘ या गृपवर तो व्हायरल केला. तो १२ वीची परीक्षा देत असलेला आदिनाथ काळूसे यांच्या मोबाईलवर आला. आदिनाथ काळूसे याच्या मोबाईलवरुन कोणीतरी पवन नागरे याला तो पेपर फाँरवर्ड केला. पवन नागरे याने गणेश शिवानंद नागरे याला फॉरवर्ड केला आणि गणेशने तो माध्यमांना पाठवला. आजपर्यंतच्या तपासापर्यंत पोलिसांनी या साखळीचा उलगडा केला आहे.
या प्रकरणातील अंकुश पृथ्वीराज चव्हाण आणि शे. अकील शे. मुनाफ हे खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक आहेत. या दोघांचा यात समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. गणेश नागरे, पवन नागरे , गणेश पालवे (रा. भंडारी ), संस्था चालक गोपाल शिंगणे , संस्था चालक गजानन आडे किनगावजट्टू या सात आरोपीतांचा या प्रकरणात समावेश आहे.
बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या एसायटी पथकात एक वरिष्ठ अधिकारी, दोन अधिकारी तर चार कर्मचारी आहेत. या पथकाचं नेतृत्व मेहकरचे पोलिस उपअधीक्षक विलास यमावार हे करणार आहेत. पोलिस उपअधीक्षक विलास यामावार हे पोलिस अधिकारी होण्यापूर्वी बारा वर्ष शिक्षक होते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने तात्काळ म्हणजे छत्तीस तासात सात आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केलीय. त्यात चार हे खासगी शाळेतील शिक्षक आहेत.
या खासगी शाळेतील शिक्षकांचा पेपरफुटीत सहभाग निष्पन्न झाल्याने आता या शाळेतील इतर कुणाचा सहभाग पेपरफुटीत आहे का ? याची चौकशी एसायटी करणार आहे. शिवाय या पेपरफुटीचं कनेक्शन राज्यातील इतर ठिकाणी आहे का ? मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हाच पेपर आढळला होता. त्याचा याच्याशी संबंध आहे का ? याची देखील चौकशी सुरू आहे. शिवाय या तपासासाठी वेळेचं बंधन नसलं तरी हा तापस लवकरात लवकर करून यातील दोषी कोण याचा शोध घेण्यासाठी आज सकाळ पासूनच एसायटी कामाला लागली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button