इनरव्हिल क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
MH 28 News Live, चिखली : स्थानिक इनरव्हील क्लबच्या वतीने दि. ८ मार्च रोजी जागतीक महिला दिनानिमित्य सेवा संकल्प प्रतिष्ठान येथील मनोरुग्णांना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
येथून जवळच असलेल्या पळसखेड सपकाळ येथे सेवा संकल्प प्रकल्प चालवला जातो. मनोरुग्ण, अनाथ व बेघर व्यक्तींचे पुनर्वसन या सेवा प्रकल्पात केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी या सेवा प्रकल्पास भेट दिली.
सेवा संकल्पचे संचालक नंदकुमार पालवे आणि आरती पालवे यांच्याशी यावेळी इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी वार्तालाप केला आणि मनोरुग्णासाठी नाईट गाऊन, बिस्कीट व अन्य वस्तू देवून महिला जागतीक दिवस साजरा केला. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा अँड. नेहा अग्रवाल, सचिव ममता बाहेती, दीपा अग्रवाल, मयूरी पांडे, गीता नागवाणी, मंगला पांचाल यांची उपस्थिती होती.
सेवा संकल्प प्रकल्पातील मनोरुग्णांसाठी भेटवस्तू मौल्यवान नसून या मनोरुग्णांची एकदा भेट घेणे ही सुद्धा एक मोठी सेवा आहे आणि अशी सेवा आमच्याकडून वेळोवेळी घडावी अशी भावना इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button