माजी आमदार राहुल बोंद्रेंकडून श्याम वाकदकर यांना मारहाण
MH 28 News Live, चिखली : आपले वडील स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली या कारणातून माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज दि. १७ मार्च रोजी त्यांच्या समर्थकांना बरोबर घेऊन मला मारहाण केली असा आरोप श्याम वाकदकर यांनी चिखली पोलिसांकडे दिलेल्या जबानीमध्ये केला आहे.
वृत्त लिहेपर्यंत या संदर्भात चिखली पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता. याबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे की भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर हे आपल्या मुलास शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेकरिता सोडवायला गेले होते. १७ मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास माजी आमदार राहुल बोंद्रे व समर्थकांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचे वाकदकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये म्हटले आहे. पत्रकारांशी बोलतानाही वाकदकर यांनी राहुल बोंद्रेंसह समर्थकांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला.
राहुल बोंद्रे यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी बोंद्रे यांनी मारहाण केल्याची चर्चा शहरात पसरली आहे. राहुल बोंद्रे यांनी सुध्दा या संदर्भात बोलताना वाकदकर यांनी आपल्या वडिलांवर आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकल्ताचे सांगितले. याबद्दल त्यांनी फेसबुकवर देखील पोस्ट केली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे विचारणा केली असता याबाबत कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button