♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” उदयनगर जि. प. सर्कलमध्ये कमळ फुलणारच ” श्वेताताईंनी व्यक्त केला विश्वास; उदयनगरमध्ये शेकडो युवकांनी केला भाजपात प्रवेश

MH 28 News Live, उदयनगर : गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना न्याय्य देणारे आमचे संविधान आहे. अंबानी असो वा अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत असतानाही त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे तसाच गरिबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष सुद्धा संविधानावर चालणारा पक्ष असून घराणेशाहीला थारा न देता सर्वांना घेऊन चालनारा पक्ष आहे. या पक्षात कर्तुत्वाला महत्त्व असून कर्तृत्वान व्यक्तीला पक्षात सर्वात जास्त संधी उपलब्ध आहेत. लोकांची कामे करतानाही भाजपा कधीही जात, धर्म पक्ष पहात नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय्य देणारा पक्ष असल्याने आणि उदयनगर जि. प. सर्कलमध्ये कामे करतांना सर्वांचीच कामे करत असल्याने इथे कमळ फुलणारच असा विश्वास आ. श्वेताताई महाले पाटील यांनी उदयनगर येथे झालेल्या पक्ष पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.

चिखली मतदारसंघात आजवर कधी नव्हे एवढा विकासनिधी आणि विकासकामे आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यामुळे गावोगावचे शेतकरी बांधव आणि युवक आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि 18 मार्च 2026 रोजी उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्वेताताई महाले यांच्या ” सबका साथ सबका विकास ” संकल्पनेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

श्वेताताईंच्या नेतृत्वामुळे युवकांना मिळाली नवी दिशा

चिखली मतदारसंघाच्या आमदार म्हणून विधानसभेत जाण्यापूर्वी श्वेताताई महाले पाटील ह्या जिल्हा परिषदेमध्ये उदयनगर गटाचे प्रतिनिधित्व करत होत्या. आपल्या कार्यकाळ त्यांनी येथील वीज, रस्ते, पाणी आदी मुलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली होती. परिणामी स्थानिक युवकांना विकासाची नवीन दिशा मिळाली. त्यामुळे मोठ्या संख्येने युवावर्ग भाजपकडे आकर्षित होऊ लागला आहे. दि. १८ मार्च रोजी आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत उदयनगर येथील सहकार विद्या मंदिर येथे झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये राम मोहिरे(काँग्रेस),रफ़ीक शेख राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव),सुनील राठोड अध्यक्ष ग्रामसेवा स.सो.ग्रा.प.सदस्य मोहदरी(काँग्रेस) ,पुरुषोत्तम राउत शिवसेना,यांनी त्यांच्या समर्थकासह प्रवेश घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वश्री हरिभाऊ ठाकरे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ ता. अध्यक्ष, जितेंद्र कलंत्री, डिगांबर राऊत, बळीरामजी काळे, भास्करराव आडळकर, संजयजी महाले, गणेश काळे, रत्नाताई राऊत, रामेश्वर लाहुडकार, अमोल साठे, महादेव ठाकरे, सरपंच विजय मोरखडे, राजकुमार राठी, गजानन काळे, राजु लाहुडकार, गजानन राऊत, सोनु सपकाळ,सचिन गरड, संतोष जराड आदी मान्यवर उपस्थित होते.

श्वेताताईंच्या नेतृत्वात मिळेल योग्य संधी – युवकांनी व्यक्त केला विश्वास

अल्पावधीतच आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे कार्यक्षम युवा महिला आमदार म्हणून श्वेताताई महाले पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप पाडली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य युवकांसाठी त्या एक ‘ रोल माँडेल ‘ ठरत आहेत. अशा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षात काम करताना आपल्याला निश्चितच योग्य संधी मिळेल असा विश्वास या पक्षप्रवेश प्रसंगी अनेक युवकांनी बोलून दाखवला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129