♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नागरिकांच्या सहकार्याने बेवारस मनोरूग्ण सेवासंकल्प टीमच्या स्वाधीन

MH 28 News Live, चिखली :
जे को रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुलें॥
तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥
संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतील हे प्रसिद्ध कडवे असून त्यांचा अर्थ गांजलेल्या, त्रासलेल्या लोकांना जो आपले म्हणून जवळ करतो तोच साधू म्हणून ओळखवा, त्यांच्या ठिकाणीच देव आहे असे समजावे. मात्र आजकाल माणुसकी पोरकी होत चालली असून हाडामांसाच्या माणसाच्या हेळसांड होतांना अनेकजण बघ्यांची भूमिका घेत असलेले पाहून अनेकांचे मन पिळवटून जाते. संत तुकाराम महाराजांनी दया, क्षमा, आणि शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश जनतेला दिला. त्यांच्या मते, संत केवळ उपदेश करणारे नसावेत, ते रंजलेल्या, गांजलेल्या जवळ करणारे असावेत, दीन दलितांना जवळ करणार्यांना साधु मानावे. खरा देव अशा संतांच्यामध्येच लपलेला असतो असा संदेश तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला आहे.

सदर अभंगवाणीचा संदेश नमूद करण्याचे कारण असे की, भारतातील सर्वात मोठी भरणारी यात्रा म्हणून सैलानीबाबा यात्रेची महती संपूर्ण भारतभर आहे. सैलानी यात्रेदरम्यान संबंध भारतभरातून यात्रेकरू, भाविक भक्त, गोरगरिब तथा अनेक व्याधींनी ग्रस्त नागरिक, मनोरूग्ण सैलानी येथे दरवर्षी येत असतात. मात्र त्यातील सर्वचजण घरी परतत नसून आसपासच्या शहरासह अनेक गावांमध्ये ही अनाथ, अपंग, बेसहारा हाडामांसाची माणसे रेंगाळतांना पहावयास मिळतात. यांच्यापासून कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी एकठिकाणी पडून असल्यामुळे कुणाचेही लक्ष त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यांना मदत करण्याचे धाडस स्वार्थधर्जिण्या बहुसंख्य माणसाकडे नसते. त्यामुळे त्यांची आबाळ होत राहते व ते येणार्या जाणार्या बहुसंख्य नागरिकांच्या दृष्टीस पडत राहतात. अशाच प्रकारे चिखली शहरातील मेहकर फाटा परिसरातील राष्ट्रमाता माँ जिजाऊ पुतळ्यासमोरील मोकळ्या जागेत गेल्या आठ दहा दिवसांपासून एक नागरिक रस्त्यावर पडून होता. अनेकजण त्याला पाहून पुढे जात होता मात्र त्याला कुणी मदत करीत नव्हते. चार पाच दिवसांपासून एकाच ठिकाणी पडून असल्यामुळे तसेच याठिकाणची वर्दळ पाहता येथील हॉटेल व्यावसायिक तथा अँग्रोवनचे प्रतिनिधी सचिन अवसरमोल, तालुका बातमीदार विनोद खरे यानी त्यांची चौकशी केली असता तो देगलुर जि. नांदेड येथील असल्याचे समजले. एका ठिकाणी पडून असल्यामुळे हा मनुष्य आजारी तसेच त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसत असल्यामुळे त्याला औषधोपचार व मदत मिळावी याकरिता जवळपासच्या प्रकल्पात पाठविण्याबाबत ठरविले.

सुरूवातीला दिव्या फाऊंडेशनचे अशोक काकडे यांना याबाबत माहिती देण्यात आली मात्र ते बाहेरगावी प्रवासात असल्याकारणाने येथून जवळच असलेल्या सेवा संकल्प प्रकल्पाला याबाबत येथील बाजार समितीचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.सत्येंद्र भुसारी तथा शेतकरी संघटनेेचे नेते देविदास कणखर यांनी सेवासंकल्पचे नंदु पालवे यांना याबाबत कळविले. त्यांच्या सहकार्याने सेवासंकल्प टीम काल ता. 23 रोजी प्रकल्पाची चमू अॅम्ब्युलन्स घेवून त्वरीत मेहकर फाट्यावरील ठिकाणी आली. यावेळी सेवासंकल्पच्या सहकार्यांसमवेत उपस्थितांनी या आजारी तसेच एका ठिकाणी पडून असलेल्या माणसाला या अॅम्ब्युलन्समध्ये बसवून प्रकल्पावर रवाना करण्यात आले. यावेळी सेवा संकल्पचे संभाजी मामा काळे, गौरव मोरे, विनोद चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी दिनकरराव बावस्कर साहेब, सचिन अवसरमोल, तालुका बातमीदार विनोद खरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

माणुसकीच्या नात्याने मदत करा….
सैलानी यात्रेनिमित्त तसेच इतर कारणामुळे अनेक ठिकाणी अनाथ, अपंग, बेसहारा मनोरूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. घरातील वाद, तसेच इतर कारणांमुळेदेखील अशा मनोरूग्णांच्या संख्येत होणारी वाढ सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब आहे. अशा मनोरूग्णांना मदत करण्याकरिता आपण सर्वांनी सरसावले पाहिजे जेणेकरून त्यांना योग्य ठिकाणी पोहचवून त्यांना योग्य ती मदत मिळू शकेल.
– डॉ.सत्येंद्र भुसारी
माजी सभापती, बाजार समिती, चिखली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129