♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्वेताताईंच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिलासा… पीकविम्याची रक्कम होणार ३१ मार्चपर्यंत खात्यात जमा

MH 28 News Live, चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील विशेषतः चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील पीक विम्याचा लाभच न मिळालेल्या शेतकऱ्यांना तसेच नुकसान भरपाई देताना कंपनीच्या चुकीमुळे निर्माण झालेली तफावतची रक्कम ३१ मार्चच्या आत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती. याच संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करून ही मागणी अखेरपर्यंत रेटली. आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केलेल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी ३१ मार्चपर्यंत सदर तफावतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. यामुळे आ. महाले यांच्या प्रयत्नातून पीक विमा कंपनीच्या चुकीचा फटका बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यातील खरीप २०२२ – २३ मध्ये एकूण ५० हजार २३८ शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनी कडे विमा काढला. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत २५ हजार ३८२ व काढणी पश्चात नुकसानीमध्ये २२ हजार ७३ असे एकूण ४७ हजार ४५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे २५ हजार ३८२ ऑनलाइन तक्रारी पैकी १७ हजार ४४९ शेतकऱ्यांना रुपये १४ . २१ कोटी व काढणी पश्चात नुकसानीचे २२ हजार ७३ पैकी ६८६६ शेतकऱ्यांना रुपये १६ . १९ कोटी असे एकूण २४ हजार ३१५ शेतकऱ्यांना रुपये ३० . ४० कोटी नुकसान भरपाई कंपनीने दिली आहे.

चिखली तालुक्यातील अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ७९३३ व काढणी पश्चात नुकसानीचे १५ हजार २०७ असे एकूण २३ हजार १४० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच बुलडाणा तालुक्यामध्ये खरीप २०२२- २३ मध्ये एकूण ३५ हजार ५०६ शेतकऱ्यांनी भारतीय कृषीविमा कंपनीकडे विमा काढला. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ३५ हजार १९२ व काढणी पश्चात नुकसानीमध्ये ६७३७ असे एकूण ४१ हजार ९२९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे दाखल केल्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ३५ हजार १९२ ऑनलाइन तक्रारीपैकी १५ हजार ३५५ शेतकऱ्यांना रुपये ११ कोटी दोन लाख १२ हजार १७५ व काढणीपश्चात नुकसानीचे ६७३७ पैकी २५६८ शेतकऱ्यांना रुपये ४ कोटी ४१ लाख १७ हजार १७१ एकूण १७९२३ शेतकऱ्यांना रुपये १५ कोटी ४३ लाख २९ हजार ३४६ नुकसान भरपाई कंपनीने दिली आहे. मात्र बुलडाणा तालुक्यात अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ७५४२ व काढणी पश्चातनुकसानीचे २५६६ असे एकूण १०१०८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. तसेच चिखली तालुक्यामध्ये मौजे एकलारा, जांभरून व इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. एकाच मंडळात एकाच वेळी लागून असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त गटात झालेल्या नुकसानीची एकाच वेळेत काढणी पश्चात नुकसानीची एकाच वेळी तक्रार करूनही काही शेतकऱ्यांना अत्यल्प तर काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे.

एकलारा मंडळाचे उदाहरण

चिखली तालुक्यातील एकलरा मंडळातील सुधाकर तोताराम अंभोरे यांचे गट क्र. ५०० मध्ये सोयाबिन पीक १.४१ पेरले होते तर नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्या गट क्र ११२ मधील १.३ हेक्टरमधील सोयाबिन पिकांचेच काढणी पश्र्चात अनुक्रमे १० आँक्टोबर ते १२ आँक्टोबर २०२३ दरम्यान नुकसान झाल्याने त्यांनी ११, १० व १४ आँक्टोबर २०२३ रोजी ऑनलाईन तक्रार केली . वरील दोन्ही शेतकऱ्यांना अनुक्रमे ४७,१७५ व ५३,७२५ प्रति हेक्टर प्रमाणे ६६,५१७ आणि ६८,५४३ एव्हढी रक्कम मिळाली आहे. तर शोभा वसंतराव अंभोरे यांच्या गट क्रमांक ५०१ मधील शेतात सोयाबीन पिकाचे १.८ हेक्टर विमा संरक्षित केले होते. दि. ६ आँक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या सोयाबिन पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाले. त्यांनी दि. ९ आँक्टोबर २०२२ रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यांना प्रति हेक्टर ४१६३ रूपये प्रमाणे ७४९३ एव्हढी अत्यल्प रक्कम मिळाली. म्हणजेच शोभा तोताराम अंभोरे यांना श्री सुधाकर तोताराम अंभोरे यांच्या पेक्षा ४३०१२ तर नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्यापेक्षा ४८, ५६२ रूपये कमी मिळाले. तसेच सुधाकर तोताराम अंभोरे यांच्या क्षेत्राचा विचार केल्यास नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्यापेक्षा ५५०० कमी रक्कम मिळाली आहे. (तालुका कृषी विभाग चिखली यांच्या माहितीवरून ) त्यामुळे एकाच गावात एकाच वेळी सारखे नुकसान होउन सारखेच पंचनामे होउन देखील नुकसान भरपाई देताना मात्र भेदभाव करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्वेताताईंच्या पत्रावर कृषी विभागाला दिले तडकाफडकी आदेश

चिखली तालुक्यातील अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ७९३३ व काढणीपश्चात नुकसानीचे १५ हजार २०७ असे एकूण २३ हजार १४० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामध्ये १२७२ शेतकरी असे आहेत ज्यांना रुपये १००० च्या आत कमी नुकसान दर्शविलेले आहे. पीक विमा नुकसान भरपाई देतेवेळी किमान एक हजाराच्या वर नुकसान भरपाई द्यावी असा नियम आहे. असे असताना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई देताना कुणाला २०० कुणाला ३०० अशी एक हजाराच्या आत रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची तफावत रक्कम काढून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांना १००० च्या आत रक्कम दर्शवली त्यांना १००० पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्यामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली असल्याने अद्याप ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, ज्या शेतकऱ्यांना पंचनामे करतांना भेदभाव करून कमी रक्कम दिली त्या शेतकऱ्यांच्या आणि एक हजारा पेक्षा कमी रक्कम नुकसान भरपाई दर्शविलेली आहे त्यांना नियमानुसार एक हजारपेक्षा जास्त रक्कम ३१ मार्च च्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात यावे अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या पत्रातून दि. २३ मार्च २०२३ रोजी आ. श्वेताताई महाले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी आ. महाले यांच्या पत्राची तातडीने दखल घेतली आणि चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्यातील तफावतीचीची रक्कम ३१ मार्चपर्यंत जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.

आ. महाले यांनी दिलेला शब्द पाळला

शेतकरी कुटुंबातून राजकीय क्षेत्रात आलेल्या आ. श्वेताताई महाले यांना बळीराजाबद्दल खरी आस्था आहे. केवळ दिखावा करण्यासाठी त्या ‘ बळीराजा ‘ या शब्दाचा वापर करत नाहीत याची प्रचिती बरेचदा आली आहे. पीकविम्याच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करणारे आणि या नुकसानभरपाईच्या रकमेतील तफावतीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांचे गेल्या आठवड्यातील उपोषण स्वतः श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेऊन सोडवले होते. तेव्हा त्यांनी ” ही समस्या आपण सोडवू ” असा शब्द उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना दिला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी विभागाला दिलेल्या आदेशामुळे आ. श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असेच म्हटले पाहिजे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129