
डॉ. सम्युअल हॅनेमन यांची २६८ वी जयंती उत्साहात साज
MH 28 News Live, लोणार :होमोओपॅथीचे जनक डॉ. सम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमोओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. स्थानिक कै. दुर्गा बनमेरू महाविद्यालय लोणार येथे होमोओपॅथीक डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉ. सम्युअल हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम मान्यवरच्या उपस्थितत दिपप्रज्वलन करून डॉ सम्युअल हॅनेमान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संतोष संचेती होते. कार्यक्रमाची सुरुवातिला डॉ सुशील अग्रवाल यांनी प्रस्तविक केले. डॉ. अनुपमा झोरे, डॉ. प्रतीक्षा सरकटे, डॉ. भास्कर मापारी, डॉ. इवरकर, डॉ. वसू बुलढाणा यांनी होमोओपॅथीचे महत्व पटवून दिले, डॉ सम्युअल हॅनेमान यांच्या जीवनवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला व होमोओपॅथी कशी काम करते,व बाकीच्या पॅथीच्या तुलनेत होमोओपॅथी कशी उपयुक्त आहे हे सांगण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विक्रांत मापारी, डॉ गजानन सोसे, डॉ प्रदीप झोरे व डॉ वसू हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी डॉ राजेश मुंदडा डॉ मयूर भावसार,डॉ अंकुश शिंदे,डॉ दयानंद ओव्हर, डॉ संतोष बनमेरू, डॉ मीना सोसे, डॉ ऋतु आडे, डॉ वर्षा मापारी,डॉ सौं सोनाली मुंदडा,डॉ सौं येवले तसेच निमा, डेंटल व होमोओपॅथी डॉक्टर उपस्थित होते. आभार डॉ संतोष आडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.