♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त चिखलीत निघाली शोभायात्रा

MH 28 News Live, चिखली : राजराजेश्वर भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवार, दि. २२ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आदर्श विद्यालयाजवळील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी ६ वाजता या शोभायात्रेला सुरुवात झाली तर श्री रेणुकादेवी मंदिरात समारोप करण्यात आला.

श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशराव सराफ, खाण्डल विप्र संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण खंडेलवाल व पारिक ब्राह्मण समाजातर्फे सुभाष व्यास यांनी पूजन केले. त्यानंतर वाजतगाजत निघालेली ही शोभायात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गणेशनगर जुने गाव, चिंच परिसर, सीमेंट रोड, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुन्हा जयस्तंभ चौक आणि राजा टाँवर परिसरातून जात श्री रेणुकादेवी मंदिरात महाआरती होऊन शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. तत्पूर्वी श्री बालाजी मंदिरात देखील भगवान परशुरामांची आरती पार पडली.

दरम्यान शोभायात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी सडा व रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून अनेक ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, माजी नगराध्यक्षा विमलताई देव्हडे व नगरसेवक गोविंद देव्हडे, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, रामदेव इण्डेनतर्फे शैलेंद्र बाहेती, कृती उत्पन्न बाजार समितीचे माजली संचालक काशिनाथ बोंद्रे, कुणाल बोंद्रे, श्रीराम पतसंस्थेचे संचालक चेतन देशमुख यांच्या वतीने भगवान परशुरामांचे पूजन व शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र ब्राह्मण सभा, खाण्डल विप्र संघटना, पारिक ब्राह्मण संघटना, ब्राह्मण युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांनी शोभायात्रेच्या आयोजनात पुढाकार घेतला. बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिला, पुरुष व युवक शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस विभागाकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129