♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बौद्धिक संपदा अधिकार शेतकरी ते संशोधकांसाठी महत्त्वाचा- प्रा. बारड – संत भगवानबाबा महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

MH 28 News Live, सिंदखेडराजा: स्थानिक माऊली शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचलित संत भगवानबाबा कला महाविद्यालयात जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिना निमित्त दि. २६ एप्रिल २०२३ रोजी संत भगवानबाबा कला महाविद्यालय सिंदखेडराजा आणि शिक्षण प्रसारक मंडळ तात्यासाहेब महाजन कला आणि वाणिज्य महाविद्यालय चिखली, यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन व ऑफलाइन एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वळसे व डॉ. सुभाष गव्हाणे, प्राचार्य,शिक्षण प्रसारक मंडळ तात्यासाहेब महाजन कला आणि वाणिज्य महाविद्यालय चिखली यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ. प्रदीप बारड म्हणून काम पाहले.

२६ एप्रिल हा जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी महाविद्यालयात २६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) द्वारे २००० मध्ये पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि रचना यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नक्कल करण्यापेक्षा सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वळसे यांनी आपल्या प्रस्ताविक व्यक्त केले. एसपीएम महाविद्यालय चिखली येथील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रदीप बारड हे ऑफलाइन व ऑनलाईन कार्यशाळेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, १९७० मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणार्‍या अधिवेशनाची अंमलबजावणी झाल्याची त्यामुळे २६ एप्रिल ही जागतिक बौद्धिक संपदा दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. त्यामुळे स्वनिर्मिती, सृजनतेला प्रोत्साहन देणारा आणि वाङ्मयचौर्याला प्रतिबंधित करणारा हा जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. बौद्धिक संपदा ही उच्चविद्याविभूषित व मातीत घाम गाळणाऱ्या कष्टकरी शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. हे त्यांनी अनेक छोट्या छोट्या उदाहरणांनी अत्यंत क्लिष्ट विषय सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत विशद केला व बौद्धिक संपदा अधिकाराची प्रक्रिया समजाऊन सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रिया बोचे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. निकाळजे यांनी मानले. याप्रसंगी विविध महविद्यालयातील प्राध्यापकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. संगीता वळसे, प्रा. डॉ. काकडे, प्रा. नागरे, प्रा. डॉ. दराडे, प्रा. डॉ. नागेश गायकवाड, प्रा. डॉ. विजय वाकोडे, प्रा. डॉ. सतीश मोरे तसेच महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129