♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कधी दुष्काळी कधी अवकाळी यामध्ये गेला मुक्या जीवांचा बळी… नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात दगावली ३० जनावरे, तेवढीच पाहाताहेत मरणाची वाट आणि पशुपालकांना अनुदानाची प्रतीक्षा !

MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यात अलिकडच्या काळात कधी दुष्काळाची काळी सावली तर कधी अवकाळी पाऊस, वीज आणि गारपीट असा लहरी निसर्गाचा खेळ चालत आहे. बुलडाणा जिल्ह्याला बसत आहे. नापिकी व कर्जाच्या बोज्याने शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभा असताना, त्याच्या दुधाळ जनावरांच्या जोडधंद्यावर देखील अवकाळी पावसाची कुन्हाड कोसळली आहे. जिल्ह्यात १ ते २६ एप्रिल दरम्यान वीज पडून आतापर्यंत ३० पेक्षा अधिक पशुधन मृत्युमुखी पडले. नुकसान भरपाईपोटी प्रशासनाने ६९,५००० रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. शेतकन्यांच्या मागे अस्मानी- सुलतानी संकटाचा ससेमिरा लागला आहे. लाखमोलाची शेती पिके गमावल्यानंतर आता शेतकल्याच्या पशुधनावर देखील आपत्ती ओढवली आहे.

बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार म्हणून कष्ट उपसणारा बैल नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरत आहे. पावसाने जिल्ह्यात हवामान घातली असून घरांची गोठ्यांची पडझड झाली नाही तर ३० पेक्षा अधिक लहान मोठ्या जनावरे दगावली आहेत.

ही आहे दगावलेल्या जनावरांची आकडेवारी

यावर्षी एक ते २६ एप्रिल दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ३० जनावरे वीज पडून ठार झाली. यामध्ये १० मोठी दुधाळ जनावरे, ११ लहान दुधाळ जनावर, ८ ओढ काम करणारी मोठी जनावरे तर एका लहान जनावरांचा समावेश आहे. गतवर्षी २०२२ मध्ये जून- जुलै या दोन महिन्यात पूरग्रस्त परिस्थिती व वीज पडून जिल्ह्यात ९ ऑगस्ट पर्यंत ३८ पशुधनाचा मृत्यू झाला होता. यामध्ये मोठी दुधाळ १६, ओढ काम करणारी १५ व ७ लहान जनावरांचा समावेश होता.

पूरपरिस्थिती, अतिवृष्टी या काळात पशुधनाचा झालेला मृत्यू, गोठा, निवारा याचे झालेले नुकसान से संबंधित पशुपालकाचे कंबरडे मोडणारे असते. मोठ्या प्रमाणात पशुधन मृत्युमुखी पडते. महसूल विभाग संबंधित इतर विभागांशी समन्वय साधून अतिवृष्टी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून सर्वांना सूचना, मदत, पंचनामे अशी उपाययोजना करत असतो. त्याला अनुसरून पशुधनासह वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासन निर्णयानुसार मदत, अनुदान देण्याची व्यवस्था आहे. १ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसासह विज पडून ३० जनावर मृत झाले. प्रशासनाने नुकसान भरपाई पोटी ६९, ५००० रुपयांच्या शासनाकडे अनुदानाची मागणी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129