♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार सरोवराला प्लास्टिकचा विळखा; गरज आहे तातडीच्या उपाययोजनांची

MH 28 News Live, लोणार : अंदाजे पाच लाख वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवराच्या आजूबाजूला होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे सरोवरातील जीवाणू, विषाणूवर गंभीर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लोणारच्या परिसरात प्लास्टिकचा साठा वाढत गेला, तर काही वर्षांनी सरोवरात असलेले सर्व जीवाणू, विषाणू नष्ट होतील, अशी भीती या संशोधनात्मक अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जीवशास्त्राचे अभ्यासक डॉ. समाधान फुगे व प्रा. सचिन गोसावी यांनी लोणार सरोवराच्या पाण्यावर होत असलेल्या प्लास्टिक कणांच्या परिणामावर संशोधन केले असून, त्यावर आधारलेला शोधनिबंध ‘एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. फुगे व गोसावी यांनी केलेल्या अभ्यासानुसार लोणार सरोवर प्लास्टिक व प्लास्टिकच्या सूक्ष्मकणांमुळे (मायक्रोप्लास्टिक) मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या अभ्यास दौऱ्यात लोणार सरोवरातील पाण्याचे व गाळाचे नमुने गोळा करण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये सोळाहून अधिक प्रकारच्या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे अस्तित्व आढळून आले आहे. सरोवरातील प्लास्टिक सूक्ष्मकणांचा प्रसार व त्यांचा आकार पाण्याच्या सामू प्रमाणे बदलत असल्याचे निदर्शनास आले आहे. लोणार सरोवरामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू व शैवालांचे लाखो वर्षांपासून अस्तित्व टिकून आहे. प्लास्टिक सूक्ष्मकणांच्या सरोवरातील प्रदूषणामुळे तेथील जीवसृष्टीला व तलावातील जैवरासायनिक प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे, असे या शोधनिबंधात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोणार सरोवर परिसरातील ‘सितान्हाणी’ या पवित्र कुंडात स्नान करून पापक्षालन करण्यासाठी यात्रेकरू, भक्तगण मोठ्या संख्येने सरोवर परिसरात वावरतात. यात्रेकरूंकडून प्लास्टिकचा मुबलक वापर होत असल्याने त्याचा योग्य ठिकाणी निचरा होत नाही. अनेकदा हे प्लास्टिक पाण्यात वाहते. याचा परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होत असून, वेळीच उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षाही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

या आहेत उपाययोजना

– लोणार परिसरात तातडीने प्लास्टिकबंदी व्हावी.
– सीतान्हाणीमध्ये अंघोळ करताना नागरिक साबण, शॅम्पूचा वापर करतात. त्याची रॅपर पाण्यातच टाकली जातात त्यावरही निर्बंध यावेत
-प्लास्टिक वापराच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज
– यात्रेदरम्यान विकली जाणारी खेळणी पाण्यामध्ये टाकली जाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे

लाखो वर्षांपासून लोणार सरोवरामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू व शैवालांचे अस्तित्व टिकून आहे. प्लास्टिक सूक्ष्मकणांच्या सरोवरातील प्रदूषणामुळे तेथील जीवसृष्टीला व तलावातील जैवरासायनिक प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे. हे असेच सुरू राहिले, तर पुढील दहा वर्षांमध्ये सरोवरातील शैवाल, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129