
मोफत नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन स्व. अनुराधाताईच्या स्मृती दिनानिमीत्त अनुराधा मिशनचा उपक्रम
MH 28 News Live, चिखली : गत ३१ वर्षापासून अविरतपणे ‘रूग्णसेवा हिच ईश्वरी सेवा’ समजून तपासणीबरोबरच उपचारासाठी सातत्यपूर्ण आरोग्य विषयक विविध शिबीरांचे आयोजन अनुराधा मिशनच्या माध्यमातून तात्यासाहेब बोंद्रे यांचा मानवसेवेचा वसा घेत माजी आमदार राहुल बोंद्रे हे करत आहे. दरसालाबादा प्रमाणे याहीवर्षी स्व. अनुराधाताई बोंद्रे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी भव्य निषुल्क नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन अनुराधा मिशनच्या वतीने स्थानिक मौनीबाबा संस्थान, चिखली येथे करण्यात आले आहे. तरी परीसरातील गरजू रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अनुराधा मिशनच्या वतीने केले आहे.
या नेत्र चिकित्सा शिबीर प्रसंगी षिबीरात येणा-या लाभार्थ्यांची तज्ञ व अनुभवी नेत्र चिकित्सकांकडुन तपासणी करण्यात येवुन विनामूल्य औषधीचे वितरण करण्यात येणार आहे. सदर शिबीरात मोफत तपासणी करण्यात येणार असून निषुल्क नाव नोंदणी करण्यात येणार आहे. गेल्या ३१ वर्षापासुन चिखली येथील उजाड माळरानावर शिक्षणाची गंगोत्री आनणा-या स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांचा वाढदिवस, स्व. अनुराधा ताई यांचा स्मृतीदिन, तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा वाढदिवस आदी विविध कारणांनी आजपर्यंत घेण्यात आलेल्या विविध आरोग्य व नेत्र शिबीराच्या माध्यमातुन चिखली विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरातून आलेल्या लाखो रूग्णांनी या शिबीरांचा लाभ घेतला आहे. तर अनुराधा मिशन व अनुराधा परिवाराच्या माध्यमाातून ‘मानव सेवा उद्ष्ठि ठेवीत असंख्य रूग्णांनी निषुल्क व मोफत सेवेच्या संधीचे सोने केले आहे.
अनुराधा मिशनच्या वतीने स्व. अनुराधा बोंद्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त १ मे रोजी आयोजित नेत्र चिकित्सा षिबीर प्रसंगी नेत्र चिकित्सकांची चमू, आदी तंज्ञ वैद्यकीय क्षेत्रातील नामावंत डॉक्टर व तंत्रज्ञांची उपस्थिती राहणार आहे. सदर शिबीराचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मौनीबाबा संस्थान, चिखली येथे करण्यात आले आहे. या शिबीर प्रसंगी तज्ञ व अनुभवी नेत्र चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार असून विनामूल्य औषधीचे वितरण तथा अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर शिबीरात तपासणी करण्याकरीता रूग्णांनी पुर्व नोंदणी करणे आवश्यक असून सदर नोंदणी निषुल्क असणार आहे. शिबीरात येणा-या रूग्णांकरीता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिबीर प्रसंगी नोंदणी करण्या करीता अनुराधा अर्बन बॅंक, हिरकणी महिला अर्बन, सिध्दविनायक मेडीकल मॉल, श्री मुंगसाजी महाराज सह. पतसंस्था, दि समता अर्बन बॅक या ठिकाणी गरजू रूग्णांनी 9561307875, 9960440299, 9850376202, 9823190536, 9309539427 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अनुराधा मिशनच्या वतीने माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.