
चिखली ते मलकापूर महामार्गाचे चौपदरीकरण करा – मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांची मागणी
MH 28 News Live, चिखली : चिखली वरून मलकापूरपर्यंत जाणाऱ्या राज्य महामार्ग NH-753 या रस्त्यावर कायम वाहतुकीची वर्दळ राहत असते. बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून बुलढाणा शहरातून हा मुख्य महामार्ग जातो. सदर NH-753 या रस्त्याचे जालना पासून चिखली पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम हे पूर्णत्वास आले असून चिखली ते मलकापूर या ७० किलोमीटर अंतराचा हा रस्ता अद्याप माञ अरुंदच आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दिनांक ८ मे रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्या कारणामुळे बुलढाणा येथे नेहमी नागरिकांची गर्दी असते. होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यांवर गर्दी होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. सदर येण्याची NH-753 हा प्रमुख महामार्ग पुढे जाऊन NH-6 या मुख्य महामार्गाला भेटतो. मलकापूर वरून येणारे वाहन हे पुढे मोताळा, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मॉ.साहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा, जगप्रसिद्ध लोणार सरोवर, जालना जिल्हा या सर्व गावांना जातो. त्यामुळे या महामार्गावर कायम वाहतूक जास्त प्रमाणात असते. जिल्ह्यातील शेतकरी बंधू याच रस्त्याने वाहतूक करत मलकापूर रेल्वे स्थानकावरून आपला शेतमाल पुढे मोठ मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी नेत असतो. त्यामुळे शेतमाला हमीभाव मिळतो. मात्र चिखली वरून मलकापूर ला जाणारा रस्ताचा अरुंद असल्या कारणामुळे या रस्त्यावर प्रचंड अपघात होत राहतात. तरी तात्काळ सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मन शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, चिखली शहराध्यक्ष नारायणबाप्पु देशमुख, चिखली उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे तालुका सचिव प्रवीण देशमुख, आशिष गायके, अनिल वाघमारे, भूषण काकडे, विशाल पवार, गणेश जाधव, गणेश रिंढे, आकाश पाटील, पवन पाटील यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button